या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नाशिक आणि पोलीस वार्ता न्यूज यांनी पीडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक शहरातील एका महिला कामगाराला कामाच्या ठिकाणी मानसिक आणि लैंगिक छळाचा सामना करावा लागला असून या संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पीडितेला तब्बल 6 महिने संघर्ष करावा लागला. पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामूळे पीडितेच्या तक्रारीकडे सातत्याने 6 महिने दुर्लक्ष होत होते.
तक्रारीत, पीडितेला तिच्या कामाच्या ठिकाणी वैयक्तिकरित्या त्रास देऊ लागल्याचे आढळले. तिच्या कामावर नजर ठेवणे, तिला टोमणा मारणे, लज्जास्पद मन दुखावेल असे बोलणे तसेच कामाच्या ठिकाणी सर्वांसमोर अपमान जनक वागणूक देऊन तिला असुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण केले. याबाबत कोणाला सांगितले तरी काही होणार नाही, पिडीतेला कामावरून काढून टाकण्याची तसेच बदली करण्याची धमकी दिली गेली होती.

या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेनेच्या नाशिक विभागाच्या नेत्या सौ.स्वागता उपासनी आणि पोलीस वार्ता न्यूज उपसंपादक श्री.निकाळे यांनी पीडीतेचे म्हणणे ऐकून घेत, या प्रकरणात पुढाकार घेतला. त्यांनी पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून पोलीस अधिकार्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, महिला आयोगाशी संपर्क साधला, संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात मदत केली.
शेवटी 28 जून 2025 रोजी सायंकाळी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरनं- 190/2025 नोंदवण्यात आला, ज्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), 2023 च्या कलम 78, 79 व 351(2) अंतर्गत विनयभंगाचा व पिडीतेला धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सरकारवाडा पोलीस करत आहे.

-
सौ.स्वागता उपासनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले..
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कधीही गप्प बसणार नाही. पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा होता आणि तो आम्ही यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
-
मनसे महिला सेनेतर्फे पोलीस प्रशासनाकडे अशी मागणी करण्यात येत आहे की..




































