Homeआरोग्यऔद्योगिक आस्थापनांच्या माध्यमातून कुशल मुनष्यबळाची निर्मिती व्हावी -मंत्री मंगलप्रभात लोढा

औद्योगिक आस्थापनांच्या माध्यमातून कुशल मुनष्यबळाची निर्मिती व्हावी -मंत्री मंगलप्रभात लोढा

औद्योगिक संघटना, उद्योग व त्यांचे ट्रस्ट, केंद्र किंवा राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम व स्वयंसेवी संस्था यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेण्याचा अधिकार आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्यातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करणे व संस्थांचा दर्जावाढ करून विकास करणे हे धोरण शासनाने निश्चित केले आहे. औद्योगिक आस्थापनांनी खाजगी भागीदारी धोरणाद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना दत्तक घेवून कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, असे प्रतिपादन कौशल्य विकास, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
आज दि.30 मे, 2025 रोजी नाशिक शहरातील निमा हाऊस, सातपूर येथे आयोजित ‘इंडस्ट्रीयल मिट’ मध्ये मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार डॉ.शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्यचे सचंलालक सतीश सूर्यवंशी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक अनिल गावित, निमा सचिव राजेंद्र अहिरे, कौशल्य विकासचे प्रा.उपायुक्त श्री.रिसे, उपसंचालक आर.एस मुंडासे यांच्यासह औद्योगिक आस्थापनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार औद्योगिक संघटना, उद्योग व त्यांचे ट्रस्ट, केंद्र किंवा राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम व स्वयंसेवी संस्था यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेण्याचा अधिकार आहे. दत्तक घेण्याच्या 10 वर्षे कालावधीसाठी आर्थिक सहभाग किमान 10 कोटी व 20 वर्षे कालावधीसाठी आर्थिक सहभाग 20 कोटी रूपयांचा असणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) धोरणात्मक भागीदार म्हणून काम करणार असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना त्यांचे स्थान, मूल्यांकन आणि संभाव्यतेच्या आधारे तीन याद्यांमध्ये विभागले जाणार असून त्यांच्या जागेची व इमारतीची मालकी शासनाकडे राहील. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांबाबत शासनाची धोरणे कायम राहणार आहेत. प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक पर्यवेक्षण समिती (आयएमसी) असेल जिथे नवीन येणार भागीदार अध्यक्ष असेल तर सचिव आय.टी.आय.चे प्राचार्य/ उपप्राचार्य अथवा शासनाने नियुक्त केलेली व्यक्ती असेल. या संदर्भात कोणताही वाद मिटविण्यासाठी राज्यस्तरीय संचलन समिती असणार आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी उपस्थित औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
  • जनसुनावणी संपन्न..

मंत्री श्री. लोढा यांच्या उपस्थितीत आज दुपारी भोसला मिलिटरी स्कूलमधील सभागृहात कौशल्य, रोजगार, उद्योजकता नावीण्यता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जनसुनावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार सीमा हिरे, संचालक श्री. सूर्यवंशी, सहसंचालक अनिल गावित आदी उपस्थित होते. मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले की, विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा नावलौकिक उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.

✍️पोलीस वार्ता संपादक : उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!