भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त येथील शहीद राजुभाऊ सोनवणे बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने भव्य आंतरजातीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील इच्छुक तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मुनाभाई सोनवणे यांनी केले आहे.
संस्थेच्या वतीने समाजातील एकात्मता व सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, विवाह सोहळा उत्साहात पार पडणार आहे. नोंदणीसाठी इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :
वधू-वराचा शाळा सोडल्याचा दाखला (ट्रान्सफर सर्टिफिकेट)
जातीचे प्रमाणपत्र
रहिवासी पुरावा
आधारकार्ड (अपडेट)
बँक खात्याची माहिती (पासबुक झेरॉक्स)
पासपोर्ट साईज फोटो (६ प्रती)
अधिक माहितीसाठी मुनाभाई सोनवणे (९२२६४८४२०३) तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




































