Homeक्राईमबोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले आहे. भुसावळ येथील जिल्हा व तिसरे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जाधव यांनी रविवारी (ता. १) निकाल देत आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न व हत्या हे आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले. शिक्षेबाबतचा युक्तिवाद सोमवारी (ता. २) होणार असून आरोपीस फाशी की जन्मठेप, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रभावी बाजू मांडत २३ साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचा निर्णय दिला.

असा उघडकीस आला थरारक गुन्हा

बोरखेडा गावातील मेताब भिलाला पावरा हे कुटुंबीयांसह मध्यप्रदेशात नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. घरात सविता (वय १३), राहुल (११), अनिल (८) आणि सुमन (६) ही चार लहान मुले एकटी होती. दरम्यान, १६ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी शेजारी मुस्तफा शेख यासिन शहा यांनी घराचा दरवाजा बंद असल्याचे पाहून आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता घरात चारही बालकांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले.

घटनास्थळी कुऱ्हाड पडलेली होती. बालिकेच्या गळ्यावर व मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न उघड होण्याच्या भीतीतून हत्याकांड

तपासात आरोपी महेंद्र बारेला हा मृत मुलांचा परिचित असल्याचे समोर आले. त्याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिच्या भावंडांना जाग आल्याने प्रकार उघड होण्याची भीती निर्माण झाली. त्यातून आरोपीने संतापाच्या भरात चारही बहीण-भावांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाला.

या अमानुष हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. आता दोषसिद्धीनंतर आरोपीला कोणती शिक्षा सुनावली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!