Homeआरोग्यसातपूर येथील चोरीचा तपास करत असताना, शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकाची मोठी...

सातपूर येथील चोरीचा तपास करत असताना, शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकाची मोठी कामगिरी!

आरोपींकडून पोलिसांनी 6 लॅपटॉप, 53 मोबाईल असा एकुण 35,10,100/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील सातपूर हद्दीत असलेल्या अशोक नगर भागातील जाधव संकुल मधील सुयोग कलेक्शन या दुकानात दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी, सुमारे 7:40 ते 9 वाजेच्या दरम्यान काही अज्ञात चोरांनी दरवाजातून आत प्रवेश करत एच.पी व डेल कंपनीचे प्रत्येकी एक असे दोन लॅपटॉप चोरून नेल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. यावरून अज्ञात चोरांविरुध्द गुरनं- 300/2025 भा.न्या.संहिता कलम 305(अ), 331(3) प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला होता.
या अज्ञात चोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक साहेब यांच्याकडून मिळताच, शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे पोह. नाझीमखान पठाण, संदिप भांड, विशाल काठे, पोअं. अमोल कोष्टी यांचे पोलीस पथक घटनास्थळी पोहचले व गुन्ह्याची माहिती मिळवली. तपास करत असताना गुन्हेशाखेच्या पोह नाझीमखान पठाण व पोअं. अमोल कोष्टी यांना गुप्त माहिती मिळाली की, दोन संशयित चोरीचे लॅपटॉप घेवून रेल्वेने चितुर, आंध्रप्रदेश येथे पळून जाणार आहे. बातमीची खात्री करून सदर माहीती शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि. डॉ.अंचल मुदगल यांना देऊन त्यांच्या सूचनेने पोलीस पथकाने रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही संशयितांना सापळा लावून पकडले. त्याची विचारपूस केली असता त्यांनी नावे 1) रामु बालराज (वय-40), रा. बोडगुटपल्ली, कोटामंडल, नि.वित्तुर, आंध्रप्रदेश 2) सत्यवेल श्रीनिवासु, (वय-36), रा. बोडगुटपल्ली, कोटामंडल, जि.चित्तुर, आंध्रप्रदेश असे सांगितले. त्यांच्या जवळून सातपूर येथील सुयोग कलेक्शन मधील चोरीतील दोन लॅपटॉप मिळून आले.
आरोपींकडे चोरी संदर्भात अधिक विचारणा केली असता त्यांनी साथीदारांचे नाव आनंद नित्यानंद (वय-19) व एक विधीसंघर्षित बालक यांची माहिती दिली. तसेच त्यांनी मिळून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून लॅपटॉप आणि मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून पोलिसांनी 6 लॅपटॉप, 53 मोबाईल असा एकुण 35,10,100/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर आरोपी हे सराईत आहे. त्यांच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून ते उघडकीस आलेले आहे. पुढील प्रमाणे..
1) सातपुर पोलीस ठाणे, गुरनं- 300/2025, 303/2025,
2) सरकारवाडा पोलीस ठाणे, गुरनं- 262/2025, 263/2025,
3) पंचवटी पोलीस ठाणे, गुरनं- 445/2025, 454/2025,

असे एकुण 6 गुन्हे त्यांनी केले असून आरोपीतांना पुढील कारवाईसाठी सातपुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई शहर पोलीस आयुक्त मा.संदिप कर्णिक साहेब, शहर पोलीस उप-आयुक्त(गुन्हे) मा.किरणकुमार चव्हाण, सहा.पोलीस आयुक्त(गुन्हे) मा.संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनात नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात पोउनि. चेतन श्रीवंत, पोउनि. सुदाम सांगळे, पोह. प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसवे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मिलींदसिंग परदेशी, रोहिदास लिलके, महेश साळुंके, धनंजय शिंदे, उत्तम पवार, राजेश लोखंडे, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, मपोअं. अनुजा येलवे, . समाधान पवार यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!