Homeआरोग्यपूरग्रस्त व अतिवृष्टीने बाधित लोकांना तातडीने मदत कार्य व धान्य...

पूरग्रस्त व अतिवृष्टीने बाधित लोकांना तातडीने मदत कार्य व धान्य वितरण करण्याचे मंत्री छगन भुजबळांनी दिले निर्देश!

मंत्री भुजबळ यांनी रविवार, 28 सप्टेंबर रोजी येवला मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागाची शासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 100 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून अनेक नद्यांना पूर आला आहे. पुर ठिकाणाच्या व नदीकाठच्या लोकांना एनडीआरएफ कडून सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात काम सुरू आहे. नैसर्गिक संकटात शासन जनतेच्या सोबत असून आवश्यक त्या उपायोजना करण्यात येईल असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
मंत्री भुजबळ यांनी रविवार, 28 सप्टेंबर रोजी येवला मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागाची शासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. या नैसर्गिक आपत्तीत पोलीस, प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन (NDRF) विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून लोकांना मदत कार्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
आपत्तीग्रस्त कुटुंबांना 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ, ज्यांना गहू नको असतील त्यांना तेवढेच तांदूळ वाटप करण्याचे, तसेच प्रति कुटुंब 3 किलो डाळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे. गरजू आपत्तीग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवून निवारा उपलब्ध करून देण्याच्या देखील सूचना देण्यात आल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ही परिस्थिती अतिशय गांभीर्यपूर्वक हाताळून लोकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य देत आहे. तसेच गरजूंना मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील अंदरसुल येथे पाण्यात उतरून पाहणी केली. कोळगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शहरातील हुडको कॉलनी घरांची, त्यानंतर सावरगाव परिसर पाहणी करत पाटोदा शहरातील शॉपिंग सेंटर, निफाड तालुक्यातील पाचोरा, मरळगोई, लासलगाव, टाकळी विंचूर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत मदत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पाहणी दौऱ्यावर मंत्री भुजबळ यांच्या सोबत प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार विशाल नाईकवाडी, येवल्याचे प्रभारी तहसीलदार पंकज नेवसे, कृषी अधिकारी शुभम बेरड, तालुका पोनि. संदीप मंडलिक, येवला शहर पोनि. अनिल भवारी, लासलगाव पोस्टे. सहा.पोनि. भास्कर शिंदे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, मा.जि.प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, किसन धनगे, मोहन शेलार, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, डॉ.प्रवीण बुल्हे, पांडुरंग राऊत, रावसाहेब आहेर, गणपत कांदळकर, गोटू मांजरे, सुनील पैठणकर, तानाजी आंधळे, मयूर सोनवणे, सचिन सोनवणे, माधव जगताप, संतोष राऊळ, सुनील एडाईत, अमोल एडाईत, अनिल सोनवणे, नितीन जाधव, चंद्रकांत सांबरे, विशाल परदेशी, दत्ता थोरात, भूषण लाघवे, प्रकाश बागल, योगेश खैरनार, नवनाथ थोरात, पार्थ कासार, सौरभ जगताप,ओंकार मढवई, गणेश गवळी, देविदास निकम, प्रताप दाभाडे, किरण दाभाडे, बापू शेठ दाभाडे, भाऊसाहेब कदम, नवनाथ दाभाडे, भाऊसाहेब मंडलिक, अरुण मोरे, पंचम साळवे, नवनाथ पोळ यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!