कुंड्रा, शिरपूर, वेळाबाई, मोहदा, कृष्णापूर, पुरड, मुकुटबन या गावांच्या प्रवासासाठी नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल..
पोलीस वार्ता, वणी : तालुक्यात मागील वर्षभरापासून महा.राज्य परिवहन मंडळाची बस सेवा बंद झाली असल्यामुळे कुंड्रा, शिरपूर, वेळाबाई, मोहदा, कृष्णापूर, पुरड, मुकुटबन या गावांच्या प्रवासासाठी नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील शेवटचे गाव कुंड्रा असून या गावातील लोकांचा तालुक्याशी दळणवळणाने जोडला जाणार दुआ म्हणजे राज्य सरकारची एसटी बस!
यासाठी शिरपूर–कुंड्रा–मुकुटबन या गावांना जोडणारी एसटी बस पुन्हा सुरू करून गावकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी याविषयाचे निवेदन आज दि.25 सप्टेंबर 2025 रोजी वणी एसटी बस आगाराचे व्यवस्थापक यांना मा.जि.परिषद सदस्य व वणी पं.स.माजी सभापती सुधाकर गोरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाकडून देण्यात आले.
यावेळी सुधाकर गोरेंनी सांगितले की, एक वर्ष होऊन गेले तरी शिरपूर–कुंड्रा–मुकुटबन एसटी बससेवा बंद असल्याने गावकऱ्यांच्या राग अनावर झाला आहे. यामुळे संबंधित गावांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शेतकरी व सामान्य गावकऱ्यांना दैनंदिन कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करणे अवघड झाले आहे. तरी राज्य परिवहन मंडळाने याचा गांभीर्याने विचार करून तात्काळ बस सेवा सुरू करून गावकऱ्यांची समस्या सोडवावी. अन्यथा मोठे जन आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर किशोर नांदेकर, बंटी ठाकूर, अमित केशवाणी, सजू तोमस्कर, डॉ.राजूरकर, अंकुश ठावरी आदींनी स्वाक्षऱ्या केल्या असून गावकऱ्यांनीही या मागणीला मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे.
महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला..
पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...