Homeताज्या बातम्याशहरात 77 व्या प्रजासत्ताक दिनी लष्करी सैन्य व पोलीस प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचे...

शहरात 77 व्या प्रजासत्ताक दिनी लष्करी सैन्य व पोलीस प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन!

सोमवार, दि.26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:50 वाजता पोलीस कवायत मैदान, नाशिक येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण..

पोलीस वार्ता, नाशिक : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि.26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:50 वाजता पोलीस कवायत मैदान, नाशिक येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी दिवसभर भारतीय सैन्य दलाकडून लष्करी उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी नागरिकांनी या प्रदर्शनास सहभागी होऊन गणतंत्र दिन साजरा करावा असे आवाहन केले आहे.
याप्रसंगी पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि भारतीय सेनेच्या आर्टिलरी स्कूल यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन व संरक्षण विषयक अत्याधुनिक उपकरणांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय सेनेच्या आर्टिलरी स्कूलकडून ड्रोन युद्धतंत्राचे प्रात्यक्षिक, तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस दलाच्या कमांडो पथकाकडून दहशतवादविरोधी कारवाईचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहेत. कवायतीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF), महाराष्ट्र पोलीस अकादमीचे पोलीस उपनिरीक्षक, वनरक्षक, नागरी संरक्षण दल तसेच भोसला मिलिटरी स्कूलचे अश्वदल पथक सहभागी होणार आहे. यातील काही पथके प्रथमच या कवायतीत सहभागी होणार असून या सोहळ्याचे ते आकर्षण ठरणार आहेत. जिल्हाधिकारी प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी पोलीस कवायत मैदानावर जाऊन प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमाची पाहणी व पूर्व तयारीचा आढावा घेतला असून नियोजित वेळेत कार्यक्रम होईल.
तसेच तीन सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान तसेच अलीकडील मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान आपत्ती निवारणासाठी संकलित निधीतून सशस्त्र सेना ध्वजदिन निधी (Armed Forces Flag Day Fund) अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे सैनिक कल्याण कार्यालयास धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष सोहळा पाहण्यासाठी नागरिकांना खुला असून, प्रदर्शनात भारतीय सेनेची विविध लष्करी शस्त्रसामग्री, तोफा, रॉकेट प्रणाली, रडार यंत्रणा, ड्रोन तसेच इतर आधुनिक उपकरणे नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुक्ताईनगरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये खळबळ

0
मुक्ताईनगर प्रतिनिधी (धनराज मांडवकर ) शहरात सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शहरातील अनेक व्यावसायिकांमध्ये खळबळ...

स्वतंत्रता संग्राम सेनानियों के नाम 10 मिनट का कार्यक्रम

0
44 वीं राष्ट्रीय श्रृंखला एवं बुरहानपुर की 49 वीं श्रृंखला संपन्न बुरहानपुर, 2 अगस्त 2026:(रमाकांत मोरे) स्वतंत्रता संग्राम सेनानियों का देश के प्रति किया गया योगदान...

येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.. पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...

खडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

0
भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात...

वृद्धावस्था पेंशन में हो रही देरी पर कांग्रेस का विरोध, सीएमओ को सौंपा ज्ञापन…

0
बुरहानपुर जिले के नगर कांग्रेस कमेटी शाहपुर एवं कांग्रेस पार्षद दल ने लंबित पेंशन का तत्काल भुगतान और नियमित पेंशन व्यवस्था सुनिश्चित करने की उठाई...

error: Content is protected !!