Homeताज्या बातम्यामहावितरणाच्या निष्काळजी पणामुळे दोन दिवसात दोन गाईंचा अपघाती मृत्यू, भोर तालुक्यातील घटना!

महावितरणाच्या निष्काळजी पणामुळे दोन दिवसात दोन गाईंचा अपघाती मृत्यू, भोर तालुक्यातील घटना!

लागोपाट दोन दिवसांत दोन घटनांनी स्थानिक महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणावर प्रश्न उपस्थित..

पोलीस वार्ता, भोर | तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील विजेच्या मेन लाईन तुटून खाली पडल्या त्यावेळी गाभण असलेली गाय या तारींच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि. 31 जुलै रोजी घडली आहे. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांत या परिसरातील ही दुसरी घटना असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये महावितरण कंपनीबद्दल रोष व्यक्त होत आहे.

याबद्दल मिळालेली माहिती अशी की, परिसरातील शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची ही मृत्यू झालेली गाय होती व ती गाभण असल्याचे कळले. याआधी दि. 29 जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर देखील विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. या लागोपाट दोन दिवसांत दोन घटनांनी स्थानिक महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणावर विचार करायला लावला आहे. गुरे रानात चारण्यासाठी नेण्यात पण आता शेतकरी व जनावर यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

या दोन्ही घटनांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील विद्युत तारांची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे.
तरी शुक्रवारी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच स्थानिक कोतवाल अजित झाडे, शिवानंद पटेल, महावितरणाचे कनिष्ठ अभियंता किकवी, सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी केली आहे. यावर महावितरण आता काय कारवाई करणार? तसेच नुकसान भरपाई मिळणार का? याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

कराड उत्तरमध्ये महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

0
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी...

अगस्त क्रांति दिवस

0
रमाकांत मोरे । अगस्त माह भारत के स्वतंत्रता इतिहास में एक विशेष महत्व रखता है। 9 अगस्त 1925 को उत्तरप्रदेश के प्रमुख शहर लखनऊ...

गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में विशेष गोष्ठी सफलतापूर्वक संपन्न

0
​बुरहानपुर | परम वंदनीय माता जी एवं अखण्ड दीप के शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा एक विशेष गोष्ठी का आयोजन...

error: Content is protected !!