Homeताज्या बातम्यायावल तालुक्यात पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी, तहसीलदार नाझीकर यांचे आदेश!

यावल तालुक्यात पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी, तहसीलदार नाझीकर यांचे आदेश!

निंबा देवी धरण, वड्डी धरण, मोर धरण, आणि शेळगाव बॅरेज आणि वाझडिसरा तलाव, हरिपुरा धरण तसेच यावल येथील पाटचारी व तलाव परिसरात प्रवेश बंदी..

पोलीस वार्ता, भुसावळ | राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पूरस्थिती असताना जळगाव जिल्ह्यातील सतत सुरू असलेली अतिवृष्टी पाहता धरण, छोटे-मोठे तलाव, पाट यांच्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागतो आहे. याच कारणाने यावल तालुक्याचे तहसीलदार मोहनमाला नाझीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने दिनांक 1 जून ते दिनांक 31 ऑक्टोंबर 2026 या कालावधीत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव सर्व नागरीकांना तालुक्यातील निंबा देवी धरण, वड्डी धरण, मोर धरण, आणि शेळगाव बॅरेज आणि वाझडिसरा तलाव, हरिपुरा धरण तसेच यावल येथील पाटचारी व तलाव परिसर यांसारख्या प्रमुख जलसाठा व पर्यटन क्षेत्रांच्या परिसरात प्रवेशावर कडक बंदी घातली आहे.

पावसामुळे पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे नदी, नाले, धरण परिसर आणि धोकादायक भागांत नागरिकांनी जाणे टाळावे. पर्यटकांनी सातपुडा परिसरातील मनुदेवी धबधबा व मंदिर परिसरात विनाकारण गर्दी करू नये. नागरिकांनी पूर व आपत्कालीन स्थितीत टोल फ्री क्रमांक- 1077 आणि जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक- 0257-2217193 / 0257-2223180 यावर संपर्क साधावा.

नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि पुढील आदेश येऊ पर्यंत सूचनांचे पालन करावे, बंदी असलेल्या ठिकाणी नागरीक आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल. याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!