Homeक्राईमरावेरमध्ये शहरात घरफोडी करणारे आरोपी 24 तासांत गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात!

रावेरमध्ये शहरात घरफोडी करणारे आरोपी 24 तासांत गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात!

सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त..

पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून रोकड व सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन संशयित चोरांना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 24 तासांत पकडून जेरबंद केले आहे. ज्यात आरोपी रितेश रविंद्र नेवे, वय-31 वर्षे, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, कलेक्टर बंगल्यामागे, जळगाव आणि आरोपी गजेंद्र सोपान चौधरी, वय-38 वर्षे, रा. मामुराबाद, इंदिरानगर, ईदगाह रोड, जळगाव, सध्या रा. सिल्वासा, जि. नगरहवेली यांना अटक करण्यात आली आहे.
रावेर पोलीस ठाण्यात दि.20 सप्टेंबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी महिला अंगणवाडी सेविका असून त्या दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त अहिरवाडी येथे गेल्या होत्या. त्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला. घरातील मौल्यवान वस्तू तपासल्या असता 50 हजार रुपये रोख रक्कम व दोन तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट आणि प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन चोरीचा गुन्हा दाखल केला.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख
गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने रावेर शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. दिवसा चोरी झाल्याने तपासात काही अडथळे येत असतानाच एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींचे चेहरे स्पष्टपणे कैद झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना दि.21 सप्टेंबर रोजी अटक केली.
 आरोपी निघाला नातेवाईक
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी रितेश नेवे हा फिर्यादी महिलेच्या बहिणीचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी व त्यांच्या बहिणीचा मागील काही वर्षांपासून संपर्क नसल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादी महिला घरात एकट्याच राहत असल्याची माहिती असल्याचा फायदा घेत आरोपी रितेश नेवे याने मित्राच्या मदतीने घरफोडी केल्याचे तपासात समोर आले आहे.

चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त
आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली. या कालावधीत आरोपींकडून गुन्ह्यातील 50 हजार रुपये रोकड आणि सुमारे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात रावेर पोलीस गुन्हे शोध पथकाला यश मिळाले.
सदर कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक मा.श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक मा.संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक मा.अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनात रावेर पोलीस ठाण्याचे पोनि. संदीप पाटील, सहा. पोनि. हरिदास बोचरे तसेच गुन्हे शोध पथकाचे पोकॉ. श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, संभाजी बिजागरे, सुकेश तडवी व विकार शेख यांनी मिळून केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

0
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात... रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

error: Content is protected !!