अर्जांचे वाटप व नोंदणी करण्याची अंतिम मुदत 29 जुलै 2026 असून मतदारांकडून Self Enumeration प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात आहे..

पोलीस वार्ता, नाशिक | शहरातील नाशिक पूर्व विधानसभा-123 मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन तसेच एकाच ठिकाणी विशेष कॅम्प आयोजित करून मतदारांकडून Self Enumeration प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात आहे. मतदार नोंदणी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी चार रिक्षा लावून जनजागृती प्रचारही करण्यात येत असून नागरिकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती नाशिक पूर्व-123 मतदारसंघाचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन हिरे यांनी दि.16 जुलै रोजी दिली.




































