Homeक्राईमनिंभोरा पोलिसांकडून खिर्डी बुद्रुक येथील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस!

निंभोरा पोलिसांकडून खिर्डी बुद्रुक येथील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस!

आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे..

पोलीस वार्ता, रावेर | तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील रहिवाशी व हॉटेल व्यावसायिक प्रवीण रमेश जैस्वाल यांनी निंभोरा पोलिसांना तक्रार दिली होती की, त्यांनी दि.29 जुलै 2026 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास त्यांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. MH 19 EX2679 घरासमोर पार्क केली असता ती चोरी झाली. त्यानुसार निंभोरा पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव ग्रामीण पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार तपास तीव्र केला आहे. त्यातूनच दाखल गुन्ह्यात गुप्त माहितीवरून मोटरसायकल चोरणाऱ्या संशयित आरोपी किरण उर्फ गफूर पीतांबर कोळी (रा. खिर्डी बु., ता.रावेर) यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन चोरी केलेली 70 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल पोलिसांच्या स्वाधीन केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गावामध्ये अनेक प्रकारच्या चोऱ्या झाल्या असून त्याचाही तपास पोलीस करत असून त्या चोरीत ही संशयित आरोपीचा कुठला सहभाग आहे का? या अनुषंगाने देखील पोलीस तपास करीत आहे.

ही कामगिरी जळगाव ग्रामीण पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर व सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. रिजवान पिंजारी, किरण चाटे, सुभाष शिंदे व सरफराज तडवी यांच्या पोलीस पथकाने मिळून केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

अकलूद येथील कुंटणखान्यावर फैजपूर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका!

तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील तर एक महिला भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली.. पोलीस वार्ता, यावल | तालुक्यातील फैजपूर पोलीस ठाणे हद्दीतील अकलूद...

एन.बी. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘साहाय्य व कायदेविषयक जनजागृती’ कार्यक्रम!

सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रिया सोप्या भाषेत समजून सांगणाऱ्या अशा कार्यक्रमांचे भविष्यातही आयोजन व्हावे.. पोलीस वार्ता, नाशिक | नाशिक मधील नामांकित सरकारी एन.बी. ठाकूर विधी (Law) महाविद्यालयाच्या...

error: Content is protected !!