Homeआरोग्यज्येष्ठ नागरिकांना मदतीकरता राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन नंबर 14567, सर्व राज्ये व केंद्रशासित...

ज्येष्ठ नागरिकांना मदतीकरता राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन नंबर 14567, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशात सुरू

ज्येष्ठांच्या अडचणी ऐकून घेणारी, त्यांना मार्गदर्शन व प्रत्यक्ष मदत देणारी ही सेवा आज अनेकांसाठी आधारवड ठरत आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन नंबर 14567 ही सेवा भारतातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू करण्यात आली आहे. राज्यात ही सेवा जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवली जात आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारांच्या वतीने गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा उपलब्ध केली आहे. या क्रमांकावर ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचे नातेवाईक देखील संपर्क साधून शकता. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विनोद शहा यांनी दिली आहे.
“घरात असूनही एकटे आहोत…”, “मुलगा परदेशात आहे…”, “नातेवाईकांनी घराबाहेर काढले…” अशा वेदनादायक अनुभवांची कहाणी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ज्येष्ठ नागरिक ‘एल्डर लाईन 14567’ या हेल्पलाईनवर मोकळेपणाने मांडत आहेत. ज्येष्ठांच्या अडचणी ऐकून घेणारी, त्यांना मार्गदर्शन व प्रत्यक्ष मदत देणारी ही सेवा आज अनेकांसाठी आधारवड ठरत आहे. वृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते.

“मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन जनसेवा फाउंडेशन गेल्या 37 वर्षांपासून सातत्याने समाजसेवेचे कार्य करत आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गरीब, आजारी, वृद्ध, अपंग, निराधार, महिला तसेच गरीब मुला-मुलींसाठी विविध कल्याणकारी प्रकल्प राबवले जात आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जाही प्राप्त झाला आहे.
हेल्पलाईनद्वारे मिळणाऱ्या मोफत सेवा
माहिती सेवा : आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृहे, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर्स याबाबत सविस्तर माहिती.
मार्गदर्शन : कायदेशीर, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत सल्ला, पेन्शन योजना, तसेच ज्येष्ठ नागरिकांचे चरितार्थ व कल्याण अधिनियम २००७ संदर्भातील माहिती.
भावनिक आधार : मानसिक ताण, चिंता, एकटेपणा, नैराश्य यावर समुपदेशन व आधार.
संरक्षण व पुनर्वसन : छळ, बेघरपणा किंवा अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत, कुटुंबीयांशी संवाद, पोलीस प्रशासनाशी समन्वय व आवश्यक ते पुनर्वसन.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंगोली येथे चौथा सर्वधर्मिय विवाह सोहळा संपन्न..

0
हिंगोली (मीनाक्षी पोळ)  येथे आज दिनांक12 मे 2026 रोजी शहरातील हिंगोली नगरपालिकेच्या कल्याण मंडपम् येथे संबोधी ॲकडमी महाराष्ट्र, सरस्वती महिला सेवाभावी संस्था व हिंगोली...

पत्रकाराच्या आंदोलनाला मोठे यश : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर अखेर गुन्हा दाखल,

0
सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद; आंदोलनानंतर राजगड पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला कापूरहोळ (ता. भोर) येथे पत्रकारावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल करणाऱ्या...

पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जाळीत उडी ; राम पाचकाळे यांचे अनोखे आंदोलन

0
पुणे : पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय,...

प्रभारी नगराध्यक्षा पदावरून भुसावळ पालिकेत वाद

0
(युवराज लोणारी यांचे संतोष चौधरींना जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आव्हान) भुसावळ : (निलेश.के.फिरके)  येथील  नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदावरून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, भाजप गटनेते युवराज...

नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रभारी कारभारावरून भुसावळ नगरपरिषदेत नवा वाद?

प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार नेमका कोणाच्या आदेशाने स्वीकारण्यात आला? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.. पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.गायत्री भंगाळे...

error: Content is protected !!