Homeआरोग्यपंचवटीत घरात घुसून सोने चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह गुन्हे शाखेच्या ताब्यात!

पंचवटीत घरात घुसून सोने चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह गुन्हे शाखेच्या ताब्यात!

आरोपीकडून अंगझडतीत एकुण 31 ग्रॅम सोन्याचे दागिणे 4,50,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील वडजाई माता नगर येथे अज्ञातांनी घरात घुसून सोने चोरी करून नेल्याची घटना दि. 21 ते 27 फेब्रुवारी सकाळी 9:0 वाजता दरम्यान घडली होती. यानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुरनं- 28/2026 भा.न्या.सं. 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील आरोपींचा तातडीने शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून शहर गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाला दिले होते. त्यानुसार अज्ञात आरोपींचा शोध घेत असतांना गुन्हे शाखेच्या पोह. प्रशांत मरकड व पोअं मुक्तार शेख यांना गुप्त माहिती मिळाली की, एक व्यक्ती चोरीचे सोने घेऊन विक्री करण्यासाठी शहरातील पंचवटी अमरधाम जवळील सराफ बाजार येथे येणार आहे. सदर माहिती शहर गुन्हे शाखा युनिट-1 चे वपोनि.डॉ. अंचल मुदगल यांना दिली. त्यांनी बातमीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. शहर गुन्हे शाखेच्या पोह. प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल देवरे, नाझीमखान पठाण, पोअं. मुक्तार शेख, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, मपोअं. अनुजा येलवे पोअं. समाधान पवार यांचे पथक तयार करून पथकाने अमरधाम कडील गौरी पंटागणाकडे येणाऱ्या डांबरी रस्त्यावर सापळा लावला.
यावेळी संशयित दिसताच त्याला पोलीस पथकाकडून ताब्यात घेण्यात आले. त्याला त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने नाव सुमित अनिल राजुरे (वय-24), रा- वार्ड नं 7, श्रीरामपुर ता.श्रीरामपुर जि.अहिल्यानगर असे सांगितले. त्याला कसून चौकशी केली असता त्याने पंचवटी हद्दीतील गुरनं- 28/2026 गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या अंगझडतीत एक सोन्याचा 10 ग्रॅमचा कॉईन व 21 ग्रॅमची चैन असे एकुण 31 ग्रॅम सोन्याचे दागिणे, 4,50,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्यामुळे आरोपीला पुढील कारवाईसाठी जप्त मालासह पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात पोउनि. चेतन श्रीवंत, महेश साळुंके, रमेश कोळी, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, राजेश लोखंडे, धनंजय शिंदे, मपोह. शर्मिला कोकणी यांचा देखील समावेश होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!