Homeउद्योगसरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील भांडी बाजार येथून मुर्ती चोरी करणाऱ्या महिला जेरबंद

सरकारवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील भांडी बाजार येथून मुर्ती चोरी करणाऱ्या महिला जेरबंद

एक गणपती मूर्ती व चार पितळी धातुच्या हत्तीच्या मुर्त्या असा एकुण 15,500/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील भांडी बाजार येथील एका दुकानातुन तीन अनोळखी महिलांनी एक गणपतीची मूर्ती व चार हत्तीच्या मुर्त्या चोरून नेल्याची तक्रार दुकान मालक फिर्यादी गिरीष दिनकर शेटे यांनी दि.20 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजेला सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून 234/2024 भा.न्या.सं. कलम 303(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करताना समोर आले की, शहरामध्ये काही महिला ह्या दुकानात घुसून तेथील गर्दीचा फायदा घेवुन दुकानदार याची नजर चुकवून चोरी करत करता आहे. आणि अशा अनेक घटना घडल्या आहेत.
त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना पकडण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी आदेश देताच, शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकाकडून तपास करत असतांना पोह. संदिप भांड यांना गुप्त माहिती मिळाली की, सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या 234/2024 गुन्ह्यातील तीन महिला ह्या बाहेरगावी जाण्यासाठी मेळा बसस्टॅन्ड, नाशिक येथे येणार आहे. ही माहिती शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे वपोनि मधुकर कड यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोउनि सुदाम सांगळे, पोह संदिप भांड, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, मिलींदसिंग परदेशी, नाझीमखान पठाण, विशाल देवरे, पोअं जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, समाधान पवार मपोअं मनिषा सरोदे, अनुजा येलवे यांचे पथक तयार करून मेळा बसस्टॅण्ड येथे जावुन सापळा रचुन जुन्या सीबीएस बसस्टॅण्ड येथे तीन संशयित महिला दिसताच पथकाने त्यांना ताब्यात घेवून त्यांची विचारपूस केली. त्यांची नावे 1) सुमनबाई सावळीराम जाधव, वय-55 वर्षे, रा-मुकुंदवाडी, संजयनगर, छत्रपती संभाजीनगर, 2) फुलाबाई शिवाजी गायकवाड, वय-35 वर्षे, रा- मुंकूदवाडी, संजयनगर, छत्रपती संभाजीनगर, 3) कमलबाई राधाकिसन जाधव, वय-45 वर्षे, रा- मुकुंदवाडी, संजयनगर, छत्रपती संभाजीनगर अशी त्यांनी सांगितली. त्यांना गुन्ह्याबाबत विचारले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातुन चोरीस गेलेली एक गणपती मूर्ती व चार पितळी धातुच्या हत्तीच्या मुर्त्या असा एकुण 15,500/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करत आहे.

सदरची कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशाने पोलीस उप-आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहा.पोआ संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात रमेश कोळी, धनंजय शिंदे, गोरक्ष साबळे, मपोह शर्मिला कोकणी यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!