Homeआरोग्यमनसेचे जयभवानीरोड येथे बिबट्याच्या हल्ल्या विरोधात वन विभाग व वन मंत्र्यांच्या निषेधार्थ...

मनसेचे जयभवानीरोड येथे बिबट्याच्या हल्ल्या विरोधात वन विभाग व वन मंत्र्यांच्या निषेधार्थ निदर्शने!

नाशिकरोड परिसरातील जय भवानीरोड आर्टेलेरी सेंटर, लोणकर मळा, थोरात मळा, वास्तू पार्क या भागात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या असून नाशिक शहरात भरलोकवस्तीत काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून आला आहे. नाशिकरोड परिसरातील जयभवानीरोड आर्टेलेरी सेंटर, लोणकर मळा, थोरात मळा, वास्तू पार्क, सहाणे मळा, कापूरसिंग मळा या भागात बिबट्या रात्री व पहाटे फिरतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तो पाळीव प्राण्यांना आपलं शिकार करत असला तरी तो माणसांवर हल्ला करू शकतो तश्या घटना घडल्या आहेत.
या संदर्भात परिसरातील स्थानिक नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी नाशिक वन विभागाला माहिती देऊन, संबंधित परिसरात पिंजरा लावण्यासाठी व बिबट्याला लवकरात लवकर पकडून त्याला नागरी लोकवस्तीपासून दूर सोडण्यास वनविभागाला माहिती दिली व विनंती देखील केली होती. परंतू आर्टेलेरी सेंटर जवळच असलेल्या वडनेर दुमाला येथे बिबट्याच्या हल्ल्याची मोठी घटना दि.8 ऑगस्ट 2025 रोजी समोर आली. चार वर्षीय आयुष किरण भगत या लहान बालकाला बिबट्याने आपले भक्ष बनवले. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून नागरिकांनी वन विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. जर वन विभागाने वेळीच ठिकठिकाणी पिंजरे लावले असते तर इतकी मोठी घटना घडली नसती. असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.
या घटनेची दखल घेत नाशिकरोड मनसे नेते व पदाधिकाऱ्यांनी वन विभाग व वन मंत्र्यांच्या विरोधात निदर्शने देत आर्टेलेरी सेंटर येथील लष्कर अधिकारी कमांडंर अ‍ॅडज्युटंट यांना निवेदन देऊन त्यांना आर्टेलेरी लष्करी परीसराच्या सुरक्षा भिंतीची दुरुस्ती करण्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मनसे नाशिक नेते अ‍ॅड.नितीन पंडित, बंटी कोरडे, गोकुळ नागरे, संजय हंडोरे, बाजीराव मते, उमेश भोई, नितीन धानापूने, विजय बोराडे, भानुमती अहिरे, मीरा आवारे, महेश पवार, वैशाली शिंदे, दर्शन शिंदे, संतोष पगारे, रोहित शिंदे, दिपक बोराडे, संदीप आहेर, रंजन पगारे, मयूर रत्नपारखी आदी पुरुष व महिला पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिह्यात बिबट्याचे हल्ले होऊन कित्येक लोक मृत्यू पडत आहेत, परंतु वन प्रशासन व वन मंत्री याबाबत गंभीर नाही. कुठलीही उपाययोजना नाही, वनविभागाकडे पिंजऱ्यांची संख्या व मनुष्य बळ कमी आहे, साहित्य व सुविधा अपुऱ्या आहेत. वनविभाग बेभरोसे आहे का? या विभागाला कोणी वनमंत्री वाली आहे का?
जयभवानी रोड परिसरात बिबट्या वारंवार दिसत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीव प्राण्यांना भक्ष करत बिबट्या आता माणसाला आपलं शिकार समजत आहे. अश्या परिस्थितीत येथील आर्टेलेरी सेंटर लष्कराची भिंत दुरुस्त करण्याची व नारिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे गरजेचे असून भारतीय लष्कर व नाशिक महानगर पालिका यांच्या वादात राज्य सरकारने हस्तक्षेप करून बिबट्यांपासून लोकवस्तीच्या सुरक्षतेसाठी ठोस उपाय योजना कराव्या असे निवेदनात दिले असून लवकर याविषयावर तोडगा काढला नाही तर मोठे जन आंदोलन उभे करण्याचे मनसे नेत्यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!