Homeआरोग्य1 जानेवारी 2025 पासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'जीवन केशरी'चा विशेष करिअर मार्गदर्शन उपक्रम!

1 जानेवारी 2025 पासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जीवन केशरी’चा विशेष करिअर मार्गदर्शन उपक्रम!

1 जानेवारी 2025 पासून ते 12 जानेवारी 2025 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना दररोज दुपारी 2 ते सायंकाळी 9 या वेळेत ऑनलाईन माध्यमातून करिअर संदर्भात मोफत मार्गदर्शन..

पोलीस वार्ता, नाशिक : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक येथील ‘जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह’ यांच्याकडून विशेष ऑनलाईन करिअर मार्गदर्शन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2025 पासून ते 12 जानेवारी 2025 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना दररोज दुपारी 2 ते सायंकाळी 9 या वेळेत ऑनलाईन माध्यमातून करिअर संदर्भात मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या करिअर विषयक शंका दूर करणे, संभ्रम मिटवणे आणि त्यांना शैक्षणिक दृष्ट्या योग्य दिशा प्रदान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत सायन्स, आर्ट्स, कॉमर्स या शाखांची निवड कशी करावी याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच इंजिनिअरिंग, मेडिकल, चार्टर्ड अकाउंटंट (CA), लॉ यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग यांसारख्या करिअर संधींचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय UPSC, MPSC, बँकिंग, पोलीस भरती अशा स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, याचेही सखोल मार्गदर्शन केले जाईल. पत्रकारिता, संगीत, नाट्य आणि क्रीडा क्षेत्रांतील करिअर संधींचीही माहिती देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न व्हाट्सअप क्रमांक 9529195688 किंवा ईमेल आयडी jivankeshrimarathi@gmail.com वर पाठवावेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नानुसार व त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन योग्य त्या विषयातील तज्ज्ञांकडून 24 ते 48 तासांमध्ये मार्गदर्शन मिळवून दिले जाईल. दहावी-बारावीच्या मागील वर्षीच्या सराव प्रश्नपत्रिकाही पीडीएफ(PDF) स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिल्या जातील.

हा उपक्रम संपूर्णतः विनामूल्य असून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेऊ शकतील. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपले भविष्य अधिक उज्ज्वल बनवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी व्हाट्सअप क्रमांक 9529195688 किंवा ईमेल आयडी jivankeshrimarathi@gmail.com वर संपर्क साधावा!

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!