Homeउद्योगभुसावळ रेल्वे स्थानकावर गुटखा कारवाई; 2.53 लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

भुसावळ रेल्वे स्थानकावर गुटखा कारवाई; 2.53 लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त कारवाईत 2 लाख 53 हजार 506 रुपयांचा गुटखा जप्त..

पोलीस वार्ता, भुसावळ : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची रेल्वेमार्गे तस्करी करण्याचा प्रयत्न भुसावळ रेल्वे स्थानकावर उधळून लावण्यात आला. भुसावळ लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त कारवाईत 2 लाख 53 हजार 506 रुपयांचा गुटखा पठाणकोट रेल्वे एक्सप्रेसमधून जप्त करण्यात आला आहे. यावेळी कारवाईत महेश शिवनारायण मालाकार, रा- शिवाजी नगर, लालबाग, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सोमवारी, दि.23 मार्च 2026 रोजी रेल्वे सुरक्षा बल पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, पठाणकोट एक्सप्रेस गाडी क्र.11058 (अप) मधून गुटखा सदृश्य तंबाखू माल आणला जात आहे. या माहितीच्या आधारे सायंकाळी सुमारे सहा वाजता पठाणकोट रेल्वे गाडी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र- 4 वर दाखल होताच रेल्वे पोलिसांकडून डब्यांची तपासणी सुरू झाली. तपासणीदरम्यान जनरल कोचमध्ये एका संशयित इसमाकडे एकूण 17 बॅग सापडल्या. या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा माल आढळून आला.

प्राथमिक चौकशीत संबंधित आरोपी हा बऱ्हाणपूर येथील असून, हा संपूर्ण माल बऱ्हाणपूर येथून आणल्याची त्याने रेल्वे पोलिसांना कबुली दिली. या प्रकरणी भुसावळ रेल्वे लोहमार्ग पोलीस पुढील तपास करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकाराच्या आंदोलनाला मोठे यश : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर अखेर गुन्हा दाखल,

0
सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद; आंदोलनानंतर राजगड पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला कापूरहोळ (ता. भोर) येथे पत्रकारावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल करणाऱ्या...

पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जाळीत उडी ; राम पाचकाळे यांचे अनोखे आंदोलन

0
पुणे : पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय,...

प्रभारी नगराध्यक्षा पदावरून भुसावळ पालिकेत वाद

0
(युवराज लोणारी यांचे संतोष चौधरींना जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आव्हान) भुसावळ : (निलेश.के.फिरके)  येथील  नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदावरून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, भाजप गटनेते युवराज...

नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रभारी कारभारावरून भुसावळ नगरपरिषदेत नवा वाद?

प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार नेमका कोणाच्या आदेशाने स्वीकारण्यात आला? हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.. पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.गायत्री भंगाळे...

सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बुबळी तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात!

गाळ काढल्याने तलावाची पाणी साठवण क्षमता वाढून परिसरातील 12 खेडी व पाड्यांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर दिलासा मिळेल.. पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या...

error: Content is protected !!