Homeआरोग्यसार्वजनिक गणेशोत्सव वर्गणी गोळा करताय तर थांबा, आधी धर्मादाय विभागाची परवानगी घेणे...

सार्वजनिक गणेशोत्सव वर्गणी गोळा करताय तर थांबा, आधी धर्मादाय विभागाची परवानगी घेणे आवश्यक..

धर्मादाय आयुक्त विभागाची परवानगी न घेता कोणतेही मंडळ वर्गणी गोळा करीत असेल तर होणार दंडात्मक कारवाई..

पोलीस वार्ता, नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सव 2025 करिता गणेश मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे, दि.13 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्धी पत्रकारद्वारे नाशिक विभागाच्या धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनिवार यांनी जाहीर केले आहे. गणेश भक्तांनी अथवा गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर नियम, अटीनुसार अर्ज करून परवानगी घ्यावी असे निर्देश दिले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 41-अ प्रमाणे धार्मिक किंवा धर्मादाय प्रयोजनाकरिता कोणताही पैसा, वर्गणी, देणगी किंवा इतर मालमत्ता गोळा करणारी कोणतीही व्यक्ती (अशी व्यक्ती या अधिनियान्वये नोंदणीकृत सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नसेल) अशा ज्या प्रयोजनासाठी अशी वसुली करीत असेल त्याबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयास कळविणे बंधनकारक असून धर्मादाय आयुक्तास अटी शर्तीच्या अधीन राहून व योग्य वाटल्यास परवानगी देण्यात येईल.

ऑनलाईन परवानगी मिळविण्यासाठी अर्ज करतेवेळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या सदस्याचे अधिकृत ओळखपत्र ( आधारकार्ड/ पॅनकार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ निवडणूक ओळखपत्र), जागा मालकीचे संमतीपत्र / महानगरपालिका/ नगरपालिका/ ग्रामपंचायत यांचे नाहरकत प्रमाणपत्र, मंडळ स्थापित केल्याचा ठराव, मागील वर्षाचा जमा खर्चाचा हिशेब (रूपये 5 हजार पेक्षा जास्त असल्यास अधिकृत लेखा परीक्षक अथवा सनदी लेखापालाकडून केलेला लेखा परीक्षण अहवाल) या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
धर्मादाय आयुक्त विभागाची परवानगी न घेता कोणतेही मंडळ वर्गणी गोळा करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, अशा मंडळांविरूद्ध कलम 41-फ प्रमाणे द्रव्यदंडासह तुरूंगवासाची शिक्षा अशी कारवाईची तरतुद आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!