चारही तालुक्यांतून एकूण 314 विद्यार्थीनींनी यात सहभाग नोंदविला आहे. करियरच्या विविध संधी, तंत्रस्नेही कोर्सेस रोजगाराच्या आणि उद्योजकता विविध संधी याबाबत मार्गदर्शन..
पोलीस वार्ता, नाशिक : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत कौशल्य विकास व करियर मार्गदर्शन विषयांवर पेठ, सिन्नर, मालेगाव व इगतपुरी तालुक्यांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. चारही तालुक्यांतून एकूण 314 विद्यार्थीनींनी यात सहभाग नोंदविला आहे. अशी माहिती सहा. आयुक्त वि.रा.रिसे यांनी दि. 21 जानेवारी 2026 दिली आहे.
विद्यार्थिनींमध्ये एमजेएम आर्ट, कॉमर्स अण्ड सायन्स कॉलेज, करंजाळी येथे आयोजित मेळाव्यात 50 विद्यार्थींनी, सिन्नर येथील शेट बी.एन. सारडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 62 विद्यार्थींनी, मालेगाव तालुक्यातील रेणूकाबाई भाऊसाहेब हिरे कन्या महाविद्यालयाच्या 163 विद्यार्थींनी आणि इगतपुरी येथील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल येथील 19 विद्यार्थींनीं तर येवला तालुक्यातील एमजीव्हीएस आर्टस् ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयातील 60 विद्यार्थींनी, कळवण तालुक्यातील आरकेएम विद्यालयातील 173 विद्यार्थींनी, देवळा तालुक्यातील कर्मवीर रामरावजी आहेर आर्टस्, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयातील 145 विद्यार्थींनी आणि दिंडोरी तालुक्यातील केआरटी विद्यालयातील 134 विद्यार्थीनी कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.
कार्यशाळेत कौशल्य विकासच्या विविध योजना, पारंपरिक शिक्षणाला कौशल्याची जोड देवून स्वयंरोजगार व उद्योजकता क्षेत्रातील संधी, सध्याच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी शिक्षण न घेता कौशल्य आधारित शिक्षण घेवून स्वावलंबी कसे बनावे इयत्ता दहावी व बारावी नंतर करियरच्या विविध संधी, तंत्रस्नेही कोर्सेस व त्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या आणि उद्योजकता क्षेत्रातील विविध संधी याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. आपले करियर निवडण्याची योग्य दिशा यासाठी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिकचे मार्गदर्शन अधिकारी सागर मोहिते, मिलिंद देशपांडे, सिद्धार्थ पवार, करियर मार्गदर्शन तज्ज्ञ आसिफ शेख व गोरक्षनाथ सांगळे, एमजेएम आर्ट, कॉमर्स अण्ड सायन्स कॉलेज, करंजाळी चे प्राचार्य श्री.दुधेकर, शेट बी.एन. सारडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिन्नर चे प्राचार्य गोरक्षनाथ बागुल, रेणूकाबाई भाऊसाहेब हिरे कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती देसले, महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल, इगतपुरी चे प्राचार्य श्री.शिंदे उपस्थित होते.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...