Homeआरोग्यजिल्हा रुग्णालय आणि संदर्भ सेवा रुग्णालयात डायलिसिस, CT स्कॅन, MRI सुविधांमध्ये नागरिकांची...

जिल्हा रुग्णालय आणि संदर्भ सेवा रुग्णालयात डायलिसिस, CT स्कॅन, MRI सुविधांमध्ये नागरिकांची गैरसोय

रुग्णांची गर्दी होत असल्याचे व बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे..

पोलीस वार्ता, नाशिक | जिल्हा रुग्णालय सिव्हिल आणि संदर्भ सेवा (शालिमार) रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रुग्णालयात डायलिसिस, सिटी स्कॅन (CT Scan) आणि एमआरआय (MRI) यांसारख्या अत्यावश्यक सुविधा नियमित व सक्षमपणे उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीचे निवेदन आरोग्य सेवा, नाशिक मंडळाचे उपसंचालक मा.कपिल आहेर यांना देण्यात आले.

निवेदनात, संदर्भ सेवा रुग्णालयात डायलिसिससाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असल्याचे व बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले आहे. यासाठी संदर्भ सेवा रुग्णालयातील बेडसंख्या आणि डायलिसिस मशीनची संख्या तातडीने वाढवावी. तसेच जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र डायलिसिस सुविधा सुरू करावी. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना संदर्भ सेवा रुग्णालयात प्राधान्याने दाखल करून घेण्याची व्यवस्था करावी. तसेच गरजू रुग्णांना शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये धर्मादाय कोट्यातून उपचार मिळवून देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यात पुढे जिल्हा रुग्णालयातील CT Scan मशीन कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक दुरुस्ती व नियमित देखभाल करावी. यंत्रणा जुनी झाल्यास अत्याधुनिक CT Scan मशीन उपलब्ध करून द्यावे, गंभीर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात MRI सुविधा सुरू करावी किंवा PPP पद्धतीने परवडणाऱ्या दरात MRI उपलब्ध करून द्यावे. ज्यात रुग्णांना बेड किंवा आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने इतरत्र हलविण्याची वेळ येऊ नये, यासाठी तातडीची प्रतिसाद यंत्रणा उभारावी. रुग्णालयातील उपलब्ध बेड, वैद्यकीय सुविधा आणि यंत्रणांची माहिती दर्शविणारा डिजिटल डिस्प्ले लावावा, अशा सर्व मागण्या निवेदनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.

निवेदनाची दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास पक्षाच्या वतीने मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ॲड. सुरेश आव्हाड यांनी दिला. निवेदन देण्यासाठी ॲड. शाम तावरे, संदीप दंडगव्हाण, किसन पाटील, बाळासाहेब बर्वे, अनिल चव्हाण, महेश भामरे, ज्योती लिलके, सुनीता पवार आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

error: Content is protected !!