Homeक्राईमजामनेर भूमी अभिलेख विभागाचा कर्मचारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात

जामनेर भूमी अभिलेख विभागाचा कर्मचारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात

शेतजमिनीच्या मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी मागितली होती लाच..

पोलीस वार्ता, जळगाव | शेतजमिनीच्या मोजणीसाठी आवश्यक असलेल्या स्कीम पत्रक व टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी 700/- रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 200/- रुपये स्वीकारणाऱ्या जामनेर येथील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दि.8 सप्टेंबर रोजी रंगेहात पकडले आहे. त्या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव भगवान गायकवाड, वय-59, नोकरी- भूमापक प्रतिलिपी, वर्ग-3, भूमी अभिलेख कार्यालय, जामनेर असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना त्यांच्या जामनेर तालुक्यातील शेतीची मोजणी करण्यासाठी स्कीम पत्रक व टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती आवश्यक होत्या. यासाठी त्यांनी दि.2 सप्टेंबर 2026 रोजी भूमी अभिलेख कार्यालय, जामनेर येथे रितसर अर्ज केला होता. संबंधित कागदपत्रांच्या प्रती देण्यासाठी कर्मचारी गायकवाड यांनी तक्रारदाराकडे 700/- रुपयांची मागणी केल्याचे, तक्रारदार याने दि.7 सप्टेंबर रोजी एसीबी, जळगाव यांना सांगितले. या तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता कर्मचारी गायकवाड यांनी तडजोडीनंतर 200/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास संमती दर्शविली. त्यानंतर मंगळवारी जामनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीने सापळा रचला. यावेळी गायकवाड यांनी 200 रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. विशेष म्हणजे आरोपी लाचखोर भगवान गायकवाड यांच्याविरुद्ध यापूर्वीही वर्ष 2012 मध्ये भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात देखील लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लाचेसंबंधी हा दुसरा गुन्हा असल्याचे समोर आले आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या पथकाने मिळून केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!