बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना संसारोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.
शिवसेनेचे उपनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, महिला संपर्कप्रमुख रेश्मा जगताप, जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. कराड नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व शिवसेना सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिंह यादव, महिला जिल्हाप्रमुख सुलोचनाताई पवार तसेच कराड उत्तर मतदारसंघातील कामगार नेत्या मीनाक्षीताई पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.

कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, एकल महिला योजना तसेच इतर शासकीय योजनांची माहिती महिलांना देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास सातारा उपजिल्हाप्रमुख श्वेता वाघमारे, रुपेश मुळे, ॲक्शन कमिटी ऑफिसर योगेश पोळ, सूर्यकिरण फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपक हजारे, वनिता सुर्वे, दिपाली वारकरी, मीना व्हावळकर, उषा लांडगे, कमल ठाकूर आदी उपस्थित होते.



































