पंचधातूपासून तयार धर्मध्वजस्तंभावर 11″ 5 फूट आकाराचा भगवा ध्वज असून मान्यवरांच्या हस्ते धर्मध्वज फडकविण्यात आला..

पोलीस वार्ता, नाशिक : येत्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक काळाराम मंदिरास आज दि.6 मे 2026 रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली याप्रसंगी त्यांच्या हस्ते अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या 21 फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वज स्तंभावर भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून उभारणी सोहळा पार पडला.
मान्यवरांच्या हस्ते धर्मध्वज फडकविण्यात आला. पंचधातूपासून तयार केलेल्या धर्मध्वजस्तंभावर 11″ 5 फूट आकाराचा भगवा ध्वज आहे. त्याच्यावर हनुमंतरायांची प्रतिमा तसेच सूर्यदेवतेचे ‘ॐ’ चिन्ह अंकित करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक अलंकरण करण्यात आले होते. सोहळ्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला औपचारिक धार्मिक प्रारंभ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर हिमगौरी आडके-आहेर, अयोध्या न्यासाचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, महंत सुधीरदास पुजारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला आमदार पंकज भुजबळ, आमदार सीमा हिरे, ‘फिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव), अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील (नाशिक), निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत,








































