Homeताज्या बातम्याभीम जयंती 135 महोत्सव निमित्त देवळालीत जयंती समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन!

भीम जयंती 135 महोत्सव निमित्त देवळालीत जयंती समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन!

जयंती उत्सव कार्यक्रम व्यवस्थित संपन्न होण्याच्या दृष्टीने नियोजन व बैठकांच्या व्यवस्थापनासाठीच देवळाली कॅम्प येथे समितीचे कार्यालय..

पोलीस वार्ता, नाशिक : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती लवकरच एप्रिल 2026 मध्ये साजरी होणार असून यासाठी संपूर्ण देशभरात व महाराष्ट्रात भीमसैनिकांची लगबग पहायला मिळत आहे. नाशिक शहरात वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी प्रचंड मोठा आंबेडकरी जनसमुदाय या उत्साहात सहभागी होत असतो.
नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात देखील भीम जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून यंदाची 135 वी जयंती ही नेहमी प्रमाणे जल्लोषात आणि सर्व धर्म बंधुभावाने साजरी करण्याचा येथील जयंती समितीचा मानस आहे. जयंती उत्सव कार्यक्रम व्यवस्थित संपन्न होण्याच्या दृष्टीने नियोजन व बैठकांच्या व्यवस्थापनासाठीच देवळाली कॅम्प येथील जुने बस स्थानक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 135 समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवार, दि.22 मार्च 2026 रोजी करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक शहराध्यक्ष अर्जुन नाना पगारे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. ‌प्रमुख पाहूणे म्हणून टायगर ग्रुपचे प्रशांत काळे यांची उपस्थिती लाभली. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे समितीच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी आरपीआय नेते सिद्धार्थ पगारे, गौतम पगारे, आर.डी जाधव, अशोक साळवे, राहुल काळे, पद्माकर दोंदे, पंडित साळवे, मिडीयाचे महेंद्र सोनवणे, नेते गौतम भालेराव आदी मान्यवर उपस्थितीत होते. आलेल्या पाहुण्यांचे गिरीष गिडा मोरे यांनी आभार मानले.
याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या कार्यकारणीतीलया जयंती अध्यक्ष यश साळवे, कार्याध्यक्ष पत्रकार गोकुळ लोखंडे, प्रकाश ‌किरवे, रविंद्र बोराडे, आकाश शेरगील, सोन्टी पारचा, शैलेश बोराडे, प्रतीम भालेराव, एड.अक्षय आडके, गोवर्धन शर्मा, अजिज शेख, संजय अनिल पगारे, सुनिल वैरागर, संजय बाळा केदारे, संजय पांडे, राकेश परदेशी, शिवा मोरे, प्रणिल शेजवळ, भारत वाघमारे, बाळासाहेब दोंदे, कुंदन दोंदे, योगेश लोखंडे, रविंद्र गांगुर्डे, शामदास आडके, राजेंद्र श्रीवंत, संतोष गायकवाड, विजय निकम, विजय मोरे, पोपटराव सोनवणे, अनिल पगारे विशाल काळे, राकेश भालेराव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते‌.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

खेडशिवापूर गावातून रिक्षा चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रिक्षा क्रमांक MH-12-QE-3537 ही दिनांक 10 ऑगस्ट, रात्री सुमारे रात्री 10 वाजता एकदंत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.. पोलीस वार्ता, भोर | राजगड पोलीस ठाणे...

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

error: Content is protected !!