नाशिक येथे सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने काल.रंजनाताई कवाडे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली..

पोलीस वार्ता, नाशिक : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा.खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या पत्नी कालकथित रंजनाताई कवाडे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन आज दि.2 मार्च रोजी भीमनगर बुद्धविहार जेलरोड नाशिक येथे सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी पीआरपी प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या मार्गदर्शनात हा श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी काल. रंजनाताई कवाडे यांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली! गणेशभाई यांनी आपल्या थोडक्यात शब्दात रंजनाताई यांना श्रद्धांजली अर्पण केली.






































