Homeक्राईमअकुलखेडा येथे अनैतिक प्रेमसंबंधातून हत्या करून एकाची आत्महत्या!

अकुलखेडा येथे अनैतिक प्रेमसंबंधातून हत्या करून एकाची आत्महत्या!

गावठी पिस्तूलातून पहिले अनिताच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली..

पोलीस वार्ता, चोपडा : तालुक्यातील अकुलखेडा येथे अनैतिक प्रेमसंबंधातून एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने गावठी पिस्तूलातून गोळी झाडून प्रियसीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून स्वतः आत्महत्या केली आहे. आज दि.28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी ही घटना समोर आली. शाळेतून घरी परतलेल्या मुलीला दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले आणि पोलिसांना माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, अकुलखेडा येथील जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरात त्यांची पत्नी अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर हे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास पाटील दाम्पत्याची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर तिने घरात प्रवेश केला असता दोघांचेही मृतदेह पाहून आरडाओरड केला तिच्या आवाजाने शेजारी जमा झाले आणि घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

अनिता पाटील आणि देवा धनगर यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळले होते. काही दिवसांपासून अनिता वेळ देत नसल्याच्या कारणावरून देवा धनगर संतप्त झाला होता. रागाच्या भरात त्याने अकुलखेडा येथील तिच्या घरी जाऊन गावठी पिस्तूलातून पहिले अनिताच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून त्याचे जीवन संपविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनास्थळी मृत देवा धनगर याची दुचाकी आढळून आली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोनि. मधुकर सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून घटनेचे नेमकं कारण शोधत आहे. या घटनेमुळे अकुलखेडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून २० वर्षीय संशयित ताब्यात

0
भुसावळ : अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० वर्षीय संशयिताला भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परिसरातून दत्तापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत...

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात

0
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर बकरी चोरीचा आरोप; वरणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र...

error: Content is protected !!