Homeताज्या बातम्याडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक वास्तूला मंत्री संजय शिरसाट...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक वास्तूला मंत्री संजय शिरसाट देणार भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे..

पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935 साली नाशिक येथे आले होते. ते दोन दिवस नाशिकरोड येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डिस्टिलरी कॉटर्स येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील जुनी अस्वनी नावाच्या बंगल्यात थांबले होते. त्यानंतर दोन दिवसांनी येवल्यात दि.13 ऑक्टोबर रोजी डॉ.बाबासाहेबांनी धर्मांतराची इतिहासिक घोषणा केली होती.

नाशिकरोड येथील सन 1935 साली पासून ऐतिहासिक वास्तू ठरलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करून ऐतिहासिक वास्तूचा दर्जा द्यावे. यासाठी सन 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळे संवर्धन समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या वतीने सातत्याने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे पाठपुरावा करत असून हा बंगला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक म्हणून घोषित करावा तसेच या ठिकाणी मोठे ग्रंथालय, पत्रकार भवन निर्माण करावे अशी मागणी केली जात आहे.

सामाजिक न्याय मंत्री मा.संजय शिरसाठ यांच्याकडे देखील निवेदन देऊन समितीने आपली मागणी शासन दरबारी न्यावी अशी मंत्री शिरसाठ यांना विनंती केली आहे. मंत्र्यांनी देखील समितीच्या मागणीला योग्य तो न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासातील पवित्र स्मृतींना, आठवणींना उजाळा देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी स्वतः मंत्री संजय शिरसाट हे येत्या दि.11 ऑक्टोबर 2026 रोजी सायं. 5 वाजता या ऐतिहासिक वास्तूला भेट देणार आहेत. यावेळी मंत्री महोदयांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी रिपब्लिकन नेते मोहन आढांगळे, कैलास तेलोरे, प्रमोद बागुल, दिलीप अहिरे, मिलिंद निकम, राजू बनसोडे, अनिल घोडेराव भास्कर साळवे, अविनाश गायकवाड यांनी या ऐतिहासिक वास्तुला भेट देऊन परिसराची पाहणी केली तसेच आयोजित कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कसा साजरा करण्यात येईल याची सविस्तर चर्चा केली. शेवटी सर्वांनी मिळून मोहन आढांगळे यांना या ऐतिहासिक कार्यात पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनंती केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून २० वर्षीय संशयित ताब्यात

0
भुसावळ : अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० वर्षीय संशयिताला भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परिसरातून दत्तापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत...

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात

0
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर बकरी चोरीचा आरोप; वरणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र...

error: Content is protected !!