Homeताज्या बातम्यासटाण्यात रिपब्लिकन सेनेच्या वतिने गिरीष महाजन यांच्या प्रतिमेचे दहन....

सटाण्यात रिपब्लिकन सेनेच्या वतिने गिरीष महाजन यांच्या प्रतिमेचे दहन….

सटाणा (नाशिक) : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी नाशिक येथिल शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्र मंत्रीमंडळातील मंत्री गिरीष महाजन यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुल्लेख करुन त्यांचे राष्ट्रापती असणारे योगदान नाकारणे एकप्रकारे कुत्सित मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. या कृत्त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून या घटनेच्या निषेधार्थ सटाणा येथे रिपब्लिकन सेनेच्या वतिने गिरीष महाजन यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले, गिरीष महाजन यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात यावी या मागणीचे निवेदन बागलाण तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले.

                भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान नाकारणे म्हणजे राष्ट्रद्रोही कृती आहे. या त्यांच्या कृत्याबद्दल संविधान संवर्धक भगिनींनी आक्षेप घेतला असता, त्यांना पोलीसांकरवी ताब्यात घेण्याचा संतापजनक प्रयत्न देखील करण्यात आला. हा प्रकार भारतीय जनतेच्या वैचारीक प्रगल्भतेचा; तसेच अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा संकोच करणारा असून राज्याच्या फॅसिष्ट कार्यप्रणालीचे दर्शन घडविणारा आहे. या घटनेसंदर्भाने संबंधित भगिनींना कुठलाही त्रास होता कामा नये  याची दखल आपणामार्फत घेण्यात यावी असेही या निवेदनात मांडण्यात आले. ज्या राष्ट्रद्रोह्यास संविधान आणि संविधानाच्या निर्मात्याचे योगदान मान्य नाही त्याला संविधानानुसार स्थापित झालेल्या मंत्रीमंडळात राहण्याचा काहीही अधिकार नाही. असे म्हणत जनभावना लक्षात घेता गिरीष महाजन यांचा राजीनामा घेऊन, मंत्रीपदावरुन दूर करण्यात यावे, अशी स्पष्ट भूमिका   रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी योगेश साळवे, साजन गायकवाड, दिनेश निकम, जय जगताप, मच्छिंद्र काकळीज, कैलास अहिरे, समाधान गरुड, तेजस उशिरे, ह्रतिक गायकवाड, स्वप्निल गांगुर्डे, राहूल बच्छाव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!