Homeराजकीयभुसावळला मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

भुसावळला मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

भुसावळ(निलेश फिरके) येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे व जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवार ता.24 रोजी दुपारी दोनला नाहाटा महाविद्यालयासमोरील नियोजित बस स्थानक मैदानावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.सभेची तयारी पूर्ण झाली आहे.मुख्यमंत्री शहर विकासाबाबत काय बोलतात याबाबत शहर वासीयांना उत्सुकता आहे.यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या जिल्ह्यातील नगराध्यक्ष सह नगरसेवकांचा सत्कार होणार आहे.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे,राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय वामन सावकारे,जळगावचे आमदार सुरेश भोळे,चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण,रजनी सावकारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहतील.
रविवारी ता.23 रोजी सकाळपासून मैदानावर जेसीबी व मजुरांच्या साह्याने सपाटीकरण व स्वच्छता करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.मंडप व व्यासपीठ तयार करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.कमीत कमी 10 ते 15 हजार लोक बसतील असे मैदानावर गौण खनिज टाकून सपाटीकरण केले आहे.सभेच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपाधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दहा पीएसआय व अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक व पीएसआय तर पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात येणार आहे सभेसाठी डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ,शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे,तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह 10 पोलीस निरीक्षक,30 पोलीस अधिकारी व 400 पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
चौकट ….
स्थानिक स्वराज्य संस्था भुसावळ येथे सार्वत्रिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या प्रिती मुकेश पाटील,निर्मल ऊर्फे पिंटू कोठारी तसेच महिमा अजय नागरणी या नगरसेवकांसह जामनेर पालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नगराध्यक्ष साधना गिरीश महाजन व नगरसेवकांचा सत्कार होणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!