गुरूवार 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत रोजगार मेळावा सुयोजित पार्क, मुंबई-आग्रारोड नाशिक..
पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक या कार्यालयाच्या वतीने गुरूवार 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस, सुयोजित कमर्शियल, सुयोजित पार्क, मुंबई-आग्रारोड नाशिक येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे, असे अधिकारी मि.भा.देशपांडे यांनी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्धी पत्रकार द्वारे जाहीर केले आहे.
सदर मेळाव्यात कोणत्याही शाखेची पदवी झालेले किंवा पदवीस शिकत असलेले प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षात शिकत असलेले उमेदवारांसाठी एकूण 100 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच शासकीय रोजगार मेळाव्यात नियोक्ता व उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सर्व सेवा निशुल्क आहेत. ही माहिती देखील देण्यात आली आहे.
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी..
पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...