सौ.माणिक विलास घुले, विलास कांतानाथ घुले या निवृत्त दाम्पत्याने 10 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला..

पोलीस वार्ता, नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटी 11 लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. ही देणगी दि.25 ऑक्टोबर रोजी ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्त उपस्थित झाले होते.
याप्रसंगी विमानतळावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, देवस्थानचे अध्यक्ष कैलास घुले, सचिव तथा मुख्याधिकारी राहुल पाटील, विश्वस्त रुपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार, मनोज थेटे, डॉ.सत्यप्रिय शुक्ल, प्रदीप तुंगार, विशेष कार्य अधिकारी अमित टोकेकर, लेखापाल प्रणव पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
-
निवृत्त दांपत्याची मुख्यमंत्र्यांना 10 लाखांची मदत!




























