Homeउद्योगशहरात कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल, छापा टाकून पोलीसांनी केली कारवाई

शहरात कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल, छापा टाकून पोलीसांनी केली कारवाई

पोलीसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी घटनास्थळी संशयित लक्ष्मी शिसोदिया ही महिला आढळून आली..

पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी शहरात प्रेम नगर, झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेला छापा टाकून अटक केली असून आणखीन एका दुसऱ्या महिलेची या व्यवसायातून सुटका केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी पोलीस ठाण्याचे पोनि. उमेश बेसरकर यांना ‘फ्रीडम फर्म’ या संस्थेच्या स्वयंसेवकांकडून माहिती मिळाली होती की, प्रेम नगर झोपडपट्टी परिसरात संशयित लक्ष्मी शिसोदिया ही महिला कुंटणखाना चालवत आहे. सदर माहिती वरिष्ठांना देऊन उपवि.पोअधि. (SDPO) वणी यांच्या आदेशानुसार पोनि. बेसरकर यांनी पोलीस पथकासह सापळा लावून एका अनोळखी 30 वर्षीय व्यक्तीला गिऱ्हाईक म्हणून लक्ष्मी शिसोदिया या महिलेकडे पाठवले. त्यानंतर सगळं ठरल्याप्रमाणे झाल्यावर पोलीसांना इशारा मिळताच वणी पोलीसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी घटनास्थळी संशयित लक्ष्मी शिसोदिया ही महिला आढळून आली. तिच्या अंगझडतीत रोख 300 रुपये मिळून आले. तसेच एक दुसरी 22 वर्षीय पीडित महिला देखील तिथे आढळून आली. पोलीसांनी तिची चौकशी केली असता, तिने सांगितले की, तिला शिसोदिया हिने धमकावून वैश्या व्यवसाय करण्यात भाग पाडले आहे.
या कारवाईत पोलीसांनी भा.न्या.सं. कलम 143, 144(2) व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 4, 5 नुसार आरोपी लक्ष्मी दिपचंद शिसोदिया, वय-45 या महिलेविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात दि.9 ऑगस्ट 2025 रोजी, रात्री 11 वाजता गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वणी पोलीस ठाणे करत आहेत.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!