Homeउद्योगगंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली आरोपीला गुन्हेशाखेने केले जेरबंद!

गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली आरोपीला गुन्हेशाखेने केले जेरबंद!

मेळा बस स्थानक येथील तालुका पोलीस ठाण्यासमोर सापळा लावुन वर्णनानुसार आरोपी दिसताच त्याला ताब्यात घेतले..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील वाहन चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगारांचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा विभागांना दिले आहेत.
त्यानुसार नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे पोलीस पथक चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असतांना पोह. प्रशांत मरकड व नाझीमखान पठाण यांना गुप्त माहिती मिळाली की, दुचाकी चोरी करणारा एक संशयित शहरातील मेळा बस स्थानक, नाशिक येथे एका हिरो कंपनीच्या स्प्लेंडर, काळ्या रंग असलेल्या दुचाकीवर येणार आहे. या बातमीची खात्री करून सदर माहिती शहर गुन्हे शाखेचे वपोनि मधुकर कड यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोह प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, विशाल देवरे, पोअं मुक्तार शेख, पोह. सुकाम पवार यांचे पथक तयार करून त्यांना कारवाईचे आदेश दिले.
पोलीस गुन्हेशाखा पथकाने मेळा बस स्थानक येथील तालुका पोलीस ठाण्यासमोर सापळा लावुन वर्णनानुसार आरोपी दिसताच त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता त्याने गिरीष भारकर शिंगुटे (वय-29) रा. एन 52, बी.ए-3 43/4, सिंहस्थनगर, सिडको, नाशिक असे सांगितले. त्याच्याकडून नंबर प्लेट नसलेली काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस, अंदाचे 50,000/- रूपये किमंतीची दुचाकी पथकाने हस्तगत करून त्याला चोरीबाबत विचारणा केली असता, मोतीवाला कॉलेज, ध्रुवनगर, गंगापुर, नाशिक येथून त्याचे तीन साथीदारांच्या मदतीने सदर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. संबंधित दुचाकी चोरीचा गंगापुर पोलीस ठाणे येथे गु.र.नं 189/2025 भा.न्या.सं. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीला जप्त मु‌द्देमालासह पुढील कारवाईसाठी गंगापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई नाशिक शहर पोआ.मा.श्री.संदिप कर्णिक, पोउपआ (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहापोआ गुन्हेशाखा संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकाने मिळून केली. पथकात रोहिदास लिलके, जगेश्वर बोरसे यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळला ‘जागतिक योग दिन २०२६’ उत्साहात साजरा!

0
भुसावळ:- "निरोगी शरीर, शांत मन; हाच पोलिसांचा खरा दागिना" आणि "योग: कर्मसु कौशलम्" हा संदेश डोळ्यांसमोर ठेवून आज दिनांक २१ जून २०२६ रोजी जळगाव...

गिरीशभाऊ महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; संबंधितांवर कारवाईची मागणी

0
भुसावळ : सामाजिक माध्यमांवर मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीशभाऊ महाजन यांच्या विरोधात आक्षेपार्ह फोटो व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट प्रसारित करून त्यांची प्रतिमा मलिन...

ऑपरेशन ‘ड्रॉप केस’ : मुक्ताईनगरातील पाच गावांवर जळगाव पोलिसांचा पहाटेचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राइक

0
मुक्ताईनगर, ता. १९ (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, लालगोटा, मधापुरी, जोधनखेडा व चारठाणा या गावांमध्ये वाढत्या फसवणूक, दरोडा व इतर गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव...

गरजु महिलांना मोफत ब्लैंकेट चे वाटप

0
सातारा (रमाकांत मोरे) जिल्ह्यातील उंब्रज येथील महिला समाज सेविका मीनाक्षीताई पोळ यांच्यातर्फे उंब्रज येथील गरजू महिलांना 430 ब्लॅंकेट चे वाटप दिनांक 17 6 2026...

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

0
जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत... ▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का? ▪️ जर स्मार्ट...

error: Content is protected !!