मेळा बस स्थानक येथील तालुका पोलीस ठाण्यासमोर सापळा लावुन वर्णनानुसार आरोपी दिसताच त्याला ताब्यात घेतले..
पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील वाहन चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगारांचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा विभागांना दिले आहेत.
त्यानुसार नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे पोलीस पथक चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असतांना पोह. प्रशांत मरकड व नाझीमखान पठाण यांना गुप्त माहिती मिळाली की, दुचाकी चोरी करणारा एक संशयित शहरातील मेळा बस स्थानक, नाशिक येथे एका हिरो कंपनीच्या स्प्लेंडर, काळ्या रंग असलेल्या दुचाकीवर येणार आहे. या बातमीची खात्री करून सदर माहिती शहर गुन्हे शाखेचे वपोनि मधुकर कड यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोह प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, विशाल देवरे, पोअं मुक्तार शेख, पोह. सुकाम पवार यांचे पथक तयार करून त्यांना कारवाईचे आदेश दिले.
पोलीस गुन्हेशाखा पथकाने मेळा बस स्थानक येथील तालुका पोलीस ठाण्यासमोर सापळा लावुन वर्णनानुसार आरोपी दिसताच त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता त्याने गिरीष भारकर शिंगुटे (वय-29) रा. एन 52, बी.ए-3 43/4, सिंहस्थनगर, सिडको, नाशिक असे सांगितले. त्याच्याकडून नंबर प्लेट नसलेली काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस, अंदाचे 50,000/- रूपये किमंतीची दुचाकी पथकाने हस्तगत करून त्याला चोरीबाबत विचारणा केली असता, मोतीवाला कॉलेज, ध्रुवनगर, गंगापुर, नाशिक येथून त्याचे तीन साथीदारांच्या मदतीने सदर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. संबंधित दुचाकी चोरीचा गंगापुर पोलीस ठाणे येथे गु.र.नं 189/2025 भा.न्या.सं. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी गंगापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई नाशिक शहर पोआ.मा.श्री.संदिप कर्णिक, पोउपआ (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहापोआ गुन्हेशाखा संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पथकाने मिळून केली. पथकात रोहिदास लिलके, जगेश्वर बोरसे यांचा देखील समावेश होता.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे..
पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935...
‘सोन्या’ला पहाटे ताब्यात घेत दिवसभर कसून चौकशी
भुसावळ : खडका रोडवरील मोहम्मद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या...
सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त..
पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका...
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..
निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात...
रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे
रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद
भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...