Homeशिक्षण-प्रशिक्षणअकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन वाढीव तारखा

अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन वाढीव तारखा

(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी डॉ मंजुषा सागर) अकरावीचे फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता .अनेक भागात विद्यार्थ्यांचे अजूनही अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्यात अनेक अडचणी आलेल्या आहेत .ऑनलाइन प्रवेश भरण्याची ही अकरावीतील विद्यार्थ्यांसाठी पहिली वेळ आहे .शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्या माध्यमातून अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अपडेट्स देण्यात आले आहे .

इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी २६/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ हा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. या कालावधीमध्ये दि. ०५ जून २०२५ पर्यंत ११,२९,९२४ विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म पूर्ण (भाग १ व भाग २ ) भरले आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांना खालील दोन प्रकारचे प्रश्न पडल्याचे दिसून येते.
1. ज्या विद्यार्थ्यांनी सदर प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग १ लॉक केला आहे तथापि भाग २ अद्याप भरणे बाकी आहे, किंवा लॉक करणे बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी दिनांक 6 जून दुपारी 12:15 ते 7 जून 2025 12:30 वाजेपर्यंत कालावधीत आपल्या अर्जाचा भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध करून आहे .तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपला पसंतीक्रम अर्ज भाग २ दिलेल्या वेळेत लॉक करावा. अशा अशा विद्यार्थ्यांनी भाग २ भरून लॉक न केल्यास त्यांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साठी व पहिल्या फेरीत प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय देण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी. यापूर्वी भाग २ लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना आपले पसंती क्रम बदलण्याची सुविधा यादरम्यान मिळणार नाही.
2. ज्या विद्यार्थ्यांनी दि. ०५ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग १ भरलेला नाही अथवा प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे व विहित मुदतीत आपला अर्जाचा भाग १ पूर्ण करू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावे. प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी अशी माहिती देण्यात आली आहे .
प्रवेश प्रक्रियेची पोर्टल लिंक याप्रमाणे https://mahafyjcadmissions.in या पोर्टलवर विद्यार्थ्यांना अधिक माहिती उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

हरसूद पुलिस की शराब परिवहन पर कार्रवाई

0
61.8 लीटर शराब के साथ दो आरोपी गिरफ्तार हरसूद पुलिस ने अवैध रूप से शराब का परिवहन करते दो आरोपियों को गिरफ्तार कर 61 लीटर...

बुरहानपुर में अखंड दीप जन्म शताब्दी 2026

0
10,000 पीले वस्त्रधारियों और वीरांगनाओं की भव्य शोभायात्रा से गूंजा शहर, 24 स्थानों पर प्रज्वलित हुए दीप बुरहानपुर ( रमाकांत मोरे) शान्तिकुंज हरिद्वार के तत्वावधान में परम...

error: Content is protected !!