Homeक्राईमपतीने पत्नीची हत्या केल्याचा संशय !

पतीने पत्नीची हत्या केल्याचा संशय !

वरणगाव – दारूच्या नशेत पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना वरणगावजवळील वेल्हाळा शिवारात उघडकीस आली आहे. ही घटना रविवार (२३ मार्च) रोजी भल्या पहाटे समोर आली आहे. अजीज सलीम शेख (वय ३३) असे संशयित आरोपीचे नाव आहे.हा घटनास्थळावरून पसार झाला आहे.
विल्हाळा शिवारातील गट क्र. ६५१ मध्ये किशोर पाटील (रा. सुसरी) यांच्या मालकीच्या विटभट्टीवर परळी वैजनाथ (जि. बीड) येथील नियाजउद्दीन शेख मन्सूर हे कुटुंबासह कामासाठी आले होते. त्यांच्यासोबत मुलगी सना आणि जावई अजीज सलीम शेखही चार मुलांसह विटा तयार करण्याचे काम करीत होते. सर्व कुटुंब एकाच परिसरातील पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत होते. अजीज सलीम शेख याला दारूचे व्यसन असल्याने तो रोज रात्री पत्नीशी भांडण करीत असे. शनिवारी रात्रीही दारूच्या नशेत तो घरी आल्यावर पत्नी सना (वय २५) हिला शिवीगाळ करू लागला. शेजारी असलेल्या सासूने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. जेवणाचा आग्रह केल्यानंतर अजीज आणि सना आपल्या मुलांसह खोलीत झोपायला गेले.
रविवारी पहाटे कामासाठी उठवायला गेल्यानंतर खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडताच सासू आणि इतर मजुरांनी पाहिले तेव्हा सना ही रक्तबंबाळ अवस्थेत मृत पडल्याचे आढळले. तिच्या डोळ्या आणि नाकातून रक्त येत होते तसेच गळ्यावर व्रण असल्याने गळा आवळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.सना शेख हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, गळा दाबल्याचा संशय असल्याने शवविच्छेदन अहवालानंतर हत्या कशी घडली याचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर पती अजीज शेख फरार झाला असून त्याच्यावरच पत्नीच्या हत्येचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी मृत सना हिचा भाऊ अजहर नियाजउद्दीन शेख मन्सूर याच्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अजीज सलीम शेख याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सह पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव, पो.कॉ. सुकराम सावकारे, मनोहर बनसोडे, भुषण माळी, साहेबराव कोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वैद्यकीय तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबनराव अव्हाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.या प्रकरणाचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव करत आहेत. पती अजीज शेख याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस पथके शोध मोहिम राबवत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!