आमदार संजय देरकर यांनी दुर्घटनेची दखल घेत त्वरित कृष्णापूर येथे घटनास्थळी भेट दिली. त्यांनी बाबाराव पाचभाई व त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करत त्यांचे सांत्वन केले.
आमदार संजय देरकर यांनी दुर्घटनेची दखल घेत त्वरित कृष्णापूर येथे घटनास्थळी भेट दिली.
पोलीस वार्ता, यवतमाळ | वणी तालुक्यातील कृष्णापूर येथे बाबाराव महादेव पाचभाई या शेतमजुराच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेने पाचभाई कुटुंबाच्या आयुष्याला मोठा फटका बसला आहे. संसार उद्ध्वस्त झाल्याने कुटुंब उघड्यावर आले असून त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
घटनेची मिळताच वणी विधानसभा मतदारसंघाचे महविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी दुर्घटनेची दखल घेत त्वरित कृष्णापूर येथे घटनास्थळी भेट दिली. त्यांनी बाबाराव पाचभाई व त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करत त्यांचे सांत्वन केले आणि संकटावर मात करण्यासाठी धीर दिला. या भेटीत आमदार संजय देरकर यांनी प्रशासनाला तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले असून आगीत झालेल्या नुकसानीचे योग्य मोजमाप करून अहवाल तयार करण्यास सांगितले. नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या भेटी दरम्यान मा.आमदार संजय देरकर यांच्यासोबत राजेंद्र इद्दे व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीही कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. स्थानिक कार्यकर्त्यांनी या घटनेनंतर कुटुंबाला अन्न, वस्त्र आणि इतर आवश्यक गोष्टी पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबरोबरच समाजानेही त्यांच्या पुनर्वसनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मा.आमदार संजय देरकर यांनी केले आहे. आमदारांच्या सक्रिय सहभागामुळे पाचभाई कुटुंबाला आशेचा किरण मिळाला असून, त्यांच्या संसाराला पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी योग्य तो आधार मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी..
पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...