Homeशिक्षण-प्रशिक्षणआपल्या आई-वडिलांना विसरू नका ; त्यांचा आदर कराः प्रा. वसंत हंकारे.

आपल्या आई-वडिलांना विसरू नका ; त्यांचा आदर कराः प्रा. वसंत हंकारे.

चोपडा – आई – वडिलांची काळजी घ्या; त्यांचा आदर करा. वेळ निघून गेल्यावर उपयोग होत नाही. ज्या आई-वडिलांनी २० वर्षे मुलींचा सांभाळ केला त्या मुली दोन दिवसांच्या प्रेमाखातर आई-वडिलांना विसरून जातात. आई-वडिलांना विसरू नका. जीवनात आई-वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण असते, अनाथांकडून जाणून घ्या,’ असे प्रतिपादन व्याख्याते व प्रबोधनकार प्रा. वसंत हंकारे यांनी केले.पंकज बोरोले यांच्या वाढदिवस निमित्त आयोजित पंकज विद्यालयाच्या प्रांगणात ‘ जगू या आनंदाने’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
प्रा वसंत हंकारे यांनी सामाजिक व ऐतिहासिक उदाहरणे देऊन आई-वडिलांचे महत्त्व, सोशल मीडियाचा सदुपयोग कसा करावा, मोबाइलचा दुरुपयोग कसा टाळावा, या संदर्भात प्रबोधन केले. त्यांचे व्याख्यान ऐकून उपस्थित तरुण-तरुणी भावूक झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले होते. तर व्यासपीठावर प्रा. चंद्रकांत सोनवणे ( आमदार – चोपडा विधानसभा मतदार संघ ) , माजी आमदार कैलास पाटील, घनशाम अग्रवाल (संचालक – जे डी सी सी बँक जळगाव ) , डॉ विकास हरताळकर, इंदिराताई पाटिल , विजयाताई पाटील, घनशाम निंबाजी पाटिल , विकास पाटिल, अविनाश राणे , गोकुळ भोळे,हेमलता बोरोले , दिपाली बोरोले आदि मान्यवर होते.
आई-वडिल व शिक्षक हे दैवत असून, सर्व समाजात प्रबोधन व्हावे. जीवनामध्ये संस्कार महत्त्वाचे असून, त्यातून परिवर्तन होण्याची गरज आहे. आई-वडिलांचा संघर्ष, कष्ट याची जाण असली पाहिजे, असेही ते म्हणाले‌.

तुमचं वय आहे का विवाह करायचं. १४ वर्षांची मुलगी आई-वडिलांना सोडून अनोळखी व्यक्तीसोबत जाते; तेव्हा त्या बापाला काय वाटत असेल… तुमचं १४ वर्षांचे वय हे विवाह करण्याचे आहे काय ? , नंतर पोलिस स्टेशनमध्ये आल्यानंतर मुलगी आई-वडिलांना ओळखत नाही, असे म्हणत प्रा. हंकारे यांनी आई-वडिलांचं नातं निष्ठेने जपावं, असे आवाहन तरुणाईला केले. अन् मुली गहिवरल्या. मुला -मुलींनी क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता शैक्षणिक पात्रता, आर्थिक क्षमता निर्माण करून एकमेकांच्या कुटुंबातील संमतीने लग्न करावे, असे व्याख्याते प्रा.वसंत हंकारे म्हणाले. विविध क्षेत्रातील उदाहरणे देत प्रारंभी विनोदनंतर भावनिक होऊन त्यांनी उपस्थित महिला, मुली व पालक यांच्या काळजाचा ठाव घेत बाप समजून घेताना विचार मांडले. बापाविषयीचा जिव्हाळा सांगताना मुलींना, महिलांना व उपस्थितांना रडू कोसळले. सदर व्याख्यानाला तोबा गर्दी उसळली होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन योगेश चौधरी यांनी केले.

पोलीस वार्ता प्रतिनिधि विनायक पाटील

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!