भुसावळ – रेल्वे स्टेशन जळगांव जुने मालधक्का वरील रोड समोर भुसावळ साईडला क्रेन वर हेल्परचे काम करीत असतांना क्रेन चा हुक रोख वायर मधून तुटून त्यांचे अंगावर पडल्याने व डोक्यात हातापयावर गंभीर दुखापत झाल्याने औषधोपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना ता.१८ रोजी सकाळी पावणे बारा ते सव्वा बारा वाजेचे दरम्यान घडली या बाबत लोहमार्ग पोलीस स्टेशन भुसावळ येथे क्रेन मालक दिलीप चौधरी, क्रेन चालक तसेच रेल्वे अधिकारी ,कर्मचारी तसेच भूमिका इंटरप्रायजेस यांचे संचालक मंडळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेत कैलास रमेश माळी हा मजूर मयत झाला होता.

दरम्यान मृतक इसम हे संशयित दिलीप चौधरी यांचे क्रेन वर हेल्पर म्हणून कामास असतांना भूमिका इंटरप्रायजेस यांनी दिलेल्या कामावरून ता.१८ रोजी रेल्वे स्टेशन जळगांव येथे आले असता व कामास सुरुवात केली त्या दरम्यान मृतक हे काम करीत असल्याने कोणत्याही सुविधेअभावी क्रेन नंबर एम.एच १९ सी व्ही ३९९० वर हेल्पर चे काम करीत असतांना क्रेन चा हुक रोख वायर मधून तुटून त्यांचे अंगावर पडल्याने डोक्यात व हातापयास गंभीर दुखापत झाल्याने औषधोपचार दरम्यान उपचार करीत असतांना अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मयत झाले आहे.त्यांच्या मरणाबाबत रेल्वे अधिकारी, कर्मचारी, क्रेन मालक व क्रेन चे चालक तसेच भूमिका इंटरप्रायजेस चे संचालक मंडळ यांच्या निष्काळजीपणामुळे व हयगयपणामुळे मृतक हा मरण पावला आहे.मृतकाचे मरणाबाबत फिर्यादी यांनी क्रेन मालक,क्रेन चालक,रेल्वे अधिकारी,कर्मचारी तसेच भूमिका इंटरप्रायजेस चे संचालक मंडळ यांचे विरुद्ध रतीलाल रमेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलीस स्टेशन भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर करीत आहे.