Homeक्राईमराणे अपघात प्रकरण : अखेर अकरा दिवसानंतर लागला छळा

राणे अपघात प्रकरण : अखेर अकरा दिवसानंतर लागला छळा

पोलिसांनी आर.टी.ओ वाहन व चालकांस नोटीस देवून सोडले

भुसावळ ( निलेश फिरके ) शहरातील खडका चौफुली पूल संपले नंतर सर्व्हिस रोड मुख्य हायवे ओलांडत असतांना एका इसमास भरधाव वेगाने जळगांव कडे जाणारे आर टी ओ वाहन चालकाने ता.१९ रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास धडक दिल्याची घटना घडली होती. दशरथ नाटू राणे असे जखमींचे नाव आहे.अखेर राणे अपघात प्रकरणांचा अकरा दिवसानंतर छळा लागला असू  पोलिसांनी आर.टी.ओ.वाहन तसेच चालकास नोटीस देवून ( सुटका) सोडले.

पंढरीनाथ नगर,पूजा कॉम्प्लेक्स येथे सप्ताहा समाप्तीचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण करून दुपारी घरी येत असतांना खडका चौफुलीचा पूल संपले नंतरचे सर्व्हिस रोडवरून मुख्य हायवे क्रमांक ५३ वर येवून हायवे ओलांडत असतांना जळगांव कडे भरधाव वेगाने जाणारे आर टी ओ वाहन क्रमांक एम.एच.०४ के.आर. ६४१९ या वाहनांचे चालक परेश भुला मराठे यांनी दशरथ नाटू राणे यास धडक देवून गंभीर जखमी केले.चालकाने वाहन काही अंतरावर थांबवून अधिकारी सह दोन कर्मचाऱ्यांनी जखमी कडे धाव घेतली व जखमीस आर टी ओ यांचे वाहनातुन हात व पाय फ्रॅक्चर झाल्याने प्रथम ट्रामा केअर सेंटर नंतर सिव्हिल हॉस्पिटल जळगांव व शेवटी गोल्डन आवर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते.ता.१९ रोजी रात्री ९:४० वाजेचे दरम्यान बाजारपेठ पोलीस स्टेशन चे कर्मचारी जखमी दशरथ राणे यांचे जाब घेण्यासाठी गेले असता ते बोलण्याच्या परिस्थितीत नव्हते यामुळे पोलिसांनी कुठलाही जबाब नोंदविला नव्हता.ता २२ रोजी डॉक्टरांनी राणे यांच्या उपचार करून प्रकृति सुधारल्याने डीसचार्ज दिला.या बाबत हरीश पंढरीनाथ राणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता २२ रोजी एक अज्ञात वाहनांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा तपास पोलीस कर्मचारी गणेश चौधरी करीत आहे.मग ता.२३ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान दशरथ राणे यांचे निधन झाले ही एक संशोधनाची बाब आहे.

अपघात ता.१९ रोजी घडला व बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला तो ही एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा.एक प्रकारे खाकी ला खाकी च्या माध्यमातून वाचविण्यासाठी तर हा प्रकार केलेला नसावा? जखमीस आर.टी.ओ वाहनातून उपचारासाठी नेले गेले उपचारही करण्यात आला यादरम्यान अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थित हॉस्पिटलमध्ये होती.राणे याचे उपचार सुरू असतानांची सदरील घटनेची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना कळविली होती का? मग कळविली असेल तर अपघातात आरोपी अनोळखी का दाखविला गेला ? सोबत धडक दिलेले वाहनही अनोळखी का दाखविण्यात आले? या प्रकरणाची सत्यता समोर येवू नये यासाठी चिरीमिरी तर घेण्यात आली नसावी? यामागील गौडबंगाल नेमके काय आहे?यांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी तसेच वाहनात असणारे चालकांसह इतरांवरही कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरीकांकडून होत आहे.

बस चालकांची नेमणूक आर.टी.ओ. …..

परेश मराठे हा आधी बस चालक म्हणून नोकरी करायचा नंतर त्यांची नेमणूक आर.टी. ओ कार्यलय जळगांव येथे चालक या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.ता.१९ रोजी एम.एच.०४ के.आर. ६४१९ या वाहनाने अधिकाऱ्यांना घेवून हायवे क्रमांक ५३ वरून एका वाळूचे वाहनांचा पाठलाग करीत असतांना वाहन भरधाव वेगाने असल्याने ओव्हर टेक करीत असतांना वाहकांचे वाहना वरील नियंत्रण सुटल्याने एका निष्पाप इसमांला चालकांच्या हलगर्जीपणा मुळे आपल्या जीवाशी मुकावे लागले.या घटनेमुळे नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.

अपघात ग्रस्त इसमास उपचार दरम्यान सोडले….

खडका चौफुलीचा पूल संपले नंतर सर्व्हिस रोडवरून हायवे रोड ओलांडत असतांना आर .टी. ओ.वाहनाने दशरथ नाटू राणे यास धडक दिली व काही अंतरावर वाहन थांबवून जखमीस वाहनात बसवून उपचारासाठी हॉस्पिटला पोहचविले मात्र सदरील घटनेची माहिती नातेवाईकांना कळताच त्यांनी हॉस्पिटल गाठले यादरम्यान आर.टी.ओ चालक व सोबतचे अधिकारी उपचार सुरू असतांनाच जखमीस ( राणे) सोडून निघून गेले.

अकरा दिवसानंतर संशयितास केले हजर व सुटका…..

पंढरीनाथ नगर,पूजा कॉम्प्लेक्स येथे सप्ताह समाप्ती झाल्यानंतर दुपारी पावणे दोन वाजेचे दरम्यान दशरथ राणे हे जेवण करून घरी येत असतांना अचानक भरधाव वेगाने येणारे वाहनाने धडक दिल्याने राणे यांचे हात व पाय फॅक्चर झाला होता.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.२२ रोजी एका अनोळखी वाहनाने धडक दिल्याने दशरथ राणे हे गंभीर दुखापत झाल्याचे दाखल करण्यात आले होते.खाकी खाकीला वाचवण्यासाठी एक बैठक घेवून सदरील प्रकरणातील दोषींना अलगत बाहेर काढून एकप्रकारे राणे परिवारावर अन्याय केला आहे.अधिकाऱ्यांना घटनेची संपर्ण माहिती असून सुद्धा आर.टी.ओ वाहन तसेच वाहनातील अधिकारी व चालकांस मुभा देण्यात आली. या अपघात प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी चिरीमिरी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.या अपघाताचा तपास सुरू असून संबंधित कार्यालयाशी पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे असे पोलीस निरीक्षक राहुल वाघ तसेच तपास अधिकारी गणेश चौधरी यांच्याकडून प्रसार माध्यमांना सांगून सदरील प्रकरणाची माहिती देण्यास टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.सर्व प्रकरणांची फिल्डिंग लागल्यानंतर शेवटी अकरा दिवसानंतर ३० रोजी आर.टी.ओ.अधिकारी यांनी दुपारी तीन वाजेचे दरम्यान शासकीय वाहन बाजारपेठ पोलीस स्टेशन समोरील लोखंडी पुलाच्या बाहेर उभे केले व वाहनातून अधिकारी सह दोन जण पायी चालत पोलीस स्टेशनला पोहचले.यादरम्यान आर.टी.ओ वाहन पोलीस स्टेशन जवळ न लावता बस स्टँड परिसरात लावण्यात आले होते.पाच मिनिटांमध्ये प्रकरण निपटवून
बाजारपेठ पोलीस स्टेशनला तपास अधिकारी गणेश चौधरी यांनी भेट घेतली.वाहनास लोखंडी पुलाबाहेर बोलावून अधिकारी व कर्मचारी पायी चालत वाहनातून बसून निघून गेले.यासंदर्भात तपास अधिकारी गणेश चौधरी यांची भेट घेतली असता त्यांनी माहिती दिली की,सदरील अपघात प्रकरणातील संशयित चालक परेश मराठे व वाहन क्रमांक एम.एच.०४ के.आर. ६४१९ या वाहनास हजर केले व वरिष्ठांचे आदेशावरून संशयित परेश मराठे व अपघातातील वाहनास जप्त करून तालुका पोलीस स्टेशनला तांत्रिक पद्धतीने तपासणी करून सदरील अपघातातील वाहन व चालक यांना नोटीस देवून सोडून देण्यात आले.

अपघाताची घटना सी.सी. टीव्ही कॅमेऱ्यात कैद …

खडका चौफुलीचा पूल संपले,नंतर सर्व्हिस रोड वरून हायवे रोड ओलांडत असतांना भरधाव वेगाने येणारे वाहनाने दशरथ राणे यास धडक दिल्याची संपूर्ण घटना सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शासकीय अधिकाऱ्यास अपघाताचे भय नाही…

दशरथ राणे यांचा अपघात एका शासकीय वाहनाने झाला मात्र आर.टी.ओ अधिकारी बिनधास्तपणे कारवाई करण्यात मग्न होते.जणू काही घटना घडलीच नाही असे भासवत आपले दैनंदिन कार्य करीत होते.जणू एखादा अपघात झाला तरी आम्हाला कोणाची भीती नाही असे भासवत होते.दशरथ राणे यांचे अपघात प्रकरणावरून स्पष्ट दिसुन आले की खाकी कडून कुठलाही गुन्हा घडल्यास शेवटी ती त्यांचीच बाजू घेत असल्याने खाकी ला खाकीच वाचवते यामुळे शासकीय अधिकाऱ्यास अपघाताचे भय नसल्याचे सिद्ध झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...
error: Content is protected !!