Homeक्राईमपोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाची पाच लाखांत फसवणूक!

पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाची पाच लाखांत फसवणूक!

भोर (प्रतिनिधी):-संतोष मोहिते भोर । तालुक्यातील ससेवाडी परिसरात पोलीस असल्याचे भासवून एका अज्ञात इसमाने ज्येष्ठ नागरिकाची सुमारे ५ लाख ५८ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. बाळासाहेब ज्ञानोबा धुमाळ (वय ६५ वर्षे, रा. उत्तमनगर, पुणे) हे दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मौजे ससेवाडी, ता. भोर, जि. पुणे येथील केंब अ‍ॅन्ड टॉर कंपनीसमोरील कच्च्या रस्त्याच्या कडेला मोटारसायकल थांबवून उभे होते. त्यावेळी त्यांच्या मागून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने स्वतःला पोलीस असल्याचे सांगत पुढे तपासणी (चेकिंग) सुरू असल्याची बतावणी केली.

सदर इसमाने धुमाळ यांना अंगावरील सोन्याचे दागिने काढून कापडात बांधून खिशात ठेवण्याचा सल्ला दिला. विश्वास संपादन करून आरोपीने धुमाळ यांच्या गळ्यातील सुमारे ८ तोळे ९०० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची चेन (अंदाजे किंमत ४,५९,१७० रुपये) तसेच २ तोळे २०० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (अंदाजे किंमत ९९,००० रुपये) कापडात बांधण्यासाठी आपल्या ताब्यात घेतली. मात्र दागिने कापडात बांधल्याचा भास निर्माण करून आरोपीने ते स्वतःकडे ठेवत घटनास्थळावरून पलायन केले. एकूण ५,५८,१७० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २०४ व ३१८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संबंधित अनोळखी इसमास पुन्हा पाहिल्यास ओळख पटवू शकतो, असे फिर्यादी यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!