अकोला ( रमाकांत मोरे ) विदर्भ येथे आज दिनांक 22 एप्रिल मंगळवार रोजी अकोला सर्किट हाऊस येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची* भव्य बैठक पार पडली सदर बैठकीत जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी संघटनेत प्रवेश घेतला तसेच काही पत्रकारांना नियुक्ती पत्र व संघटनेचे ओळख पत्र संघटनेचे अध्यक्ष मनोहरराव सुने, प्रदेश अध्यक्ष कैलास बाप्पू देशमुख, प्रदेश कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, गणेशराव सुरजूसे सर यांच्या उपस्थितीत पुरुषोत्तम इंगोले जिल्हा अध्यक्ष अकोला पश्चिम, रामरतन घावत अध्यक्ष अकोला पूर्व , समाज कार्य जिल्हा अध्यक्ष देवकीनंदन मथारिया पुजाताई निचत, यांचे हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये देवकीनंदन मथारिया सर यांची सामाजिक कार्यकर्ते जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा मार्गदर्शक, प्रा. संदीप सोळंके सर यांची जिल्हा उपाध्यक्ष, नंदकिशोर नागपुरे यांची जिल्हा सरचिटणीस, पुरुषोत्तम निमकर्डे यांची जिल्हा सचिव, पंकज इंगळे यांची जिल्हा संघटक, प्रा. विकास दामोदर यांची तेल्हारा तालुका प्रसिद्धी प्रमुख, विजय घोडे यांची तेल्हारा शहर प्रसिद्धी प्रमुख, गणेश सोनटक्के यांची तेल्हारा तालुका उपाध्यक्ष, भगवानराव हागे तालुका सचिव, रविंद्र पांडव यांची हिवरखेड नगर पंचायत अध्यक्ष, अर्जुन खिरोडकर यांची हिवरखेड सदस्य, प्रविण उरकडे याची हिवरखेड सदस्य, प्रणव गवई यांची हिवरखेड सदस्य, दिपक रेळे यांची आडगाव अध्यक्ष, गोकुळ हिंगणकार यांची गाडेगाव अध्यक्ष, तसेच अकोला शहर, बाळापूर शहर येथील पत्रकांच्या नियुक्ती यावेळी करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोहरराव सुने होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विकास दामोदर यांनी तर आभार प्रदर्शन तेल्हारा तालुका अध्यक्ष गजानन राठोड यांनी केले.






























