Homeमहत्त्वाचेभुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल

भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांनी संतप्त भूमिका घेत ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा नियोजन समिती अध्यक्षांकडे निवेदन सादर करत प्रशासनालाच जाब विचारला आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भुसावळ शहरातील अमृत पाणीपुरवठा योजना तब्बल आठ ते दहा वर्षांपासून संथ गतीने रेंगाळत असून अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. सुरुवातीला ९० कोटींची असलेली ही योजना आता १३५.७६ कोटींपर्यंत फुगली असतानाही कामाचा दर्जा आणि गती यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाईपलाईन टाकताना निकृष्ट काम झाल्याचा आरोप असून मंजूर ६५ हजार पाणी कनेक्शनपैकी अनेक नागरिक अजूनही वंचित असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

नगराध्यक्षांनी ठेकेदार आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताचा गंभीर आरोप करत शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. संबंधित ठेकेदारांची मक्तेदारी रद्द करून नवीन ठेकेदार नेमावा, प्रलंबित बिलांचे देयक थांबवावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, शहरातील विविध विकासकामांना विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करून स्थगिती मिळविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही कामे सर्वसाधारण सभेत मंजूर असून त्यांना तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्याचे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, वाढत्या लोकसंख्येमुळे स्वच्छता व्यवस्थेवर ताण येत असून मनुष्यबळ अपुरे पडत आहे. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्तीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने या विषयावरही तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

भुसावळच्या झपाट्याने वाढणाऱ्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हद्दवाढ प्रस्ताव मंजूर करून नव्या भागांना मूलभूत सुविधा देण्याची गरज नगराध्यक्षांनी अधोरेखित केली. तसेच एमआयडीसीमध्ये मोठा औद्योगिक प्रकल्प मंजूर करून १००० ते २००० युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पाणी, स्वच्छता, विकासकामे आणि रोजगार या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा नागरिकांचा रोष उफाळून येईल, असा इशाराच नगराध्यक्षांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!