Homeउद्योगनाशिकच्या आंबेडकर वाडी भागात झालेल्या दुहेरी खुनांचा उलगडा; वर्चस्व वादातून झाले खून..

नाशिकच्या आंबेडकर वाडी भागात झालेल्या दुहेरी खुनांचा उलगडा; वर्चस्व वादातून झाले खून..

आरोपींनी पुर्ववैमनस्यातुन हा खून केल्याचे सांगितले त्यात परिसरात स्वताचे वर्चस्व टिकून रहावे हा या मागचा हेतू होता..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक शहरात रंगपंचमीच्या दिवशी उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेडकर वाडी परिसरात झालेल्या दोन सख्या भावांच्या दुहेरी खुनाच्या घटनेचा उलगडा नाशिक गुन्हेशाखा युनिट-1 पोलिसांनी अवघ्या 6 तासात केला आहे.
दि.19 मार्चला रात्री 9.25 वाजेच्या सुमारास ही खुनाची घटना घडली होती यात आंबेडकर वाडीत राहणारे प्रशांत जाधव आणि उमेश उर्फ मन्ना जाधव यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यावरून उपनगर पोलीस ठाणे येथे विनोद धोंडीराम पवार यांनी दि.20 मार्च रोजी फिर्याद दिली होती, या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी तपास सुरू केला होता. गुन्ह्यातील आरोपीनां लवकरात लवकर अटक करण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.श्री संदीप कर्णीक साहेब यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने पोलीस उपायुक्त श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा. पोलीस आयुक्त श्री.संदिप मिटके यांनी गुन्हे शाखेचे काही पथके तयार करून त्यांना कारवाईसाठी मार्गदर्शन केले.
त्यानुसार घटनास्थळी गुन्हेशाखा पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन संशयित आरोपींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुप्त बातमीदाराकडून पो.ना. मिलीदसिंग परदेशी व पो.हवा. विशाल काठे या माहिती मिळाली की, आंबेडकर वाडी खून प्रकरणातील संशयित आरोपी सागर गरड हा त्याच्या साथीदारांबरोबर डाळींब मार्केट, छत्रपती संभाजीनगररोड, नाशिक येथे येणार आहे.
तत्काळ वपोनि श्री.मधुकर कड, पोउनि रविंद्र बागुल यांनी पोह प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल काठे, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, पोना विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, पोअं मुक्तार शेख, पोअं समाधान पवार अशांचे पथक तयार केले. व डाळींब मार्केट येथील परिसरात संशयित आरोपींचा शोध घेतला असता, एकूण 5 आरोपी मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व खुनाची विचारपूस करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी पुर्ववैमनस्यातुन हा खून केल्याचे सांगितले त्यात परिसरात स्वताचे वर्चस्व टिकून रहावे हा हेतू होता.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे 1) सागर मधुकर गरड (वय 32), रा.आंबेडकरवाडी 2)अनिल विष्णु रेडेकर (वय 40), रा.उत्त्तरानगर, पोतदार शाळेजवळ, तपोवनरोड 3)सचिन विष्णु रेडेकर (वय 44), रा.गायत्री नगर, पुनारोड नाशिक, 4)अविनाश उर्फ सोनु नानाजी उशिरे (वय 26) रा.सर्वेश्वर चौक, नविन सिडको, उत्तमनगर 5)योगेश चंद्रकांत रोकडे (वय 30) रा.आंबेडकरवाडी, अशी आहेत. उपनगर पोलीस ठाण्यात 113/2025 भा.न्या.सं.कलम 103, 351(3), 352, 189(2), 190, 191(2) प्रमाणे दि.20 मार्च रोजी गुन्हा दाखल असून अधिक पुढील तपास करण्यासाठी आरोपींना उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा उलघडा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1, वपोनि श्री.मधुकर कड, पोउनि चेतन श्रीवंत, पोउनि रविंद्र बागुल, पोउनि सुदाम सांगळे, प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल काठे, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, समाधान पवार तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे तुषार मोकळ, कैलास महाले तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे अमोल टर्ले यांच्या सर्वांच्या मदतीने संयुक्त रित्या करण्यात आला.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!