Homeक्राईमदेहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, पाच तरुणी ताब्यात ; दोन संशयितांना अटक

देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, पाच तरुणी ताब्यात ; दोन संशयितांना अटक

भुसावळ – तालुक्यातील नशिराबाद – जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारातील एका सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या घरात सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराच्या अड्ड्यावर नशिराबाद पोलिसांनी बुधवारी,५ नोव्हेंबर रात्री १०:३० वाजता धडक कारवाई केली.या छाप्यात पोलिसांनी पाच तरुणींना ताब्यात घेतले असून,हा व्यवसाय चालवणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी काही महिला व मुलींना डांबून ठेवून त्यांच्याकडून अवैधरीत्या वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली होती. नशिराबाद पोलिसांनी तातडीने जळगाव ए.एच.टी.यू. (मानवी तस्करी विरोधी पथक) च्या मदतीने कारवाईची योजना आखली. छाप्याच्या वेळी घरात पाच तरुणी आणि दोन चालक उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली असता, ६३ हजार ८० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी राहुल कडू पाटील (रा. रायपूर फाटा, जळगाव) आणि राम विश्वास बोरसे (रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यासह चेतन माळी व श्याम विश्वास बोरसे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र तायडे, सहायक फौजदार संजय महाजन, हवालदार शरद भालेराव,चंद्रकांत पाटील, गणेश गायकवाड, सागर भिडे, मोनाली दहीभाते, युगंधरा नारखेडे,भूषण पाटील, युनूस शेख, ज्ञानेश्वर पवार, तसेच ए.एच.टी.यू.च्या अधिकारी,कर्मचारी यांच्या पथकाकडून करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माध्यमांनी महिलांविषयी वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी!

महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या ‘इनडिसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वूमन’ कायद्याचे वारंवार उल्लंघन.. पोलीस वार्ता, मुंबई : वृत्त माध्यमांनी महिलांविषयीचे वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी,...

₹२८१ कोटींच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी; ३७५६ हेक्टर क्षेत्राला दिलासा

0
भुसावळ : पाठपुराव्याला अखेर भरीव यश मिळत कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या महत्त्वपूर्ण योजनांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१...

परभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

0
परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर,...

ट्रेचिंग ग्राउंड निरीक्षण, स्वच्छ सर्वेक्षण में नंबर-1 का लक्ष्य

0
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 की तैयारियों को लेकर नगर परिषद शाहपुर ने कमर कस ली है। इसी क्रम में अध्यक्ष प्रतिनिधि श्री वीरेंद्र तिवारी ने...

जनगणना 2027: शाहपुर में डिजिटल स्व-जनगणना को बढ़ावा

0
शाहपुर | दिनांक 20 अप्रैल 2026 नगर परिषद शाहपुर की अध्यक्ष श्रीमती साधना वीरेंद्र तिवारी द्वारा जनगणना 2027 के अंतर्गत स्व-जनगणना (Self Enumeration) प्रक्रिया को...

error: Content is protected !!