Homeक्राईमभुसावळ गोळीबार प्रकरण ; मुख्य मास्टरमाईंड वसीम पटेल " सह पाच जणांना...

भुसावळ गोळीबार प्रकरण ; मुख्य मास्टरमाईंड वसीम पटेल ” सह पाच जणांना अटक !

भुसावळ – शहरातील जाम मोहल्ला भागातील रहिवासी तैहरीन अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख या तरुणांची पूर्ववैमनस्यातून १० जानेवारी रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास शालिमार हॉटेल जवळील डी.डी सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे.या गुन्ह्यातील संशयित आरोपी सलमान अब्दुल मजिद पटेल यास एलसीबी पथकाने दिनांक ११ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा येथून ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर रात्री साडेदहा वाजेला अटक करण्यात आली.तर गोळीबार प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड वसीम पटेल ” सह पाच जणांना १२ जानेवारी रोजी अटक करण्यात आली.
मागील वर्षी खडका रोडवरील हिरा हॉल जवळ अफाक पटेल या तरुणांचा खून करण्यात आला होता.भावाचा खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने मुख्य मास्टरमाईंड वसीम पटेल यांच्या सांगण्यावरून गेले अनेक दिवसांपासून अबीद पटेल हा तैहरीन अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख या तरुणांच्या दैनंदिन हालचालीवर पाळत ठेवून होता.मुख्य मास्टरमाईंड वसीम पटेल याने जळगांव येथील अब्दुल नबी हनीप पटेल राहणार शेरा चौक मास्टर कॉलनी व सनिश नाईट मोहम्मद आसिफ राहणार एमआयडीसी एरिया जळगांव या दोघांची भेट घेवून तैहरीन अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख या तरुणांची सुपारी दिली.१० जानेवारी रोजी तैहरीन अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख व जवाई जाकीर मेहबूब खान सकाळी सहा वाजेला नमाज पठण करून आल्यानंतर चहा पित असतांना अब्दुल नबी हनीप पटेल, सनिश नाईट मोहम्मद आसिफ, अदनान शेख युनूस तसेच शेख साहिल शेख रशीद या चौघांनी चहाच्या दुकानात सव्वासात वाजेच्या सुमारास तैहरीन अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान या तरुणांवर बंदुकीने गोळ्या झाडून खून केला. गुन्ह्या घडल्यापासून संशयित आरोपी हे फरारी होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध लावून पथकातील पोउपनिरी शरद बागल,पोलीस हवालदार कमलाकर बागुल,गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे,चा.पो. हे.कॉ.सोमवंशी तसेच पोलीस कर्मचारी सचिन पोळ अशांनी मिळून दहा तासांचा प्रवास करीत संशयित आरोपी सलमान अब्दुल मजिद पटेल ऊर्फे रमीज पटेल यास चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा येथून नातेवाईकांच्या घरांमधून ताब्यात घेवून ११ जानेवारी रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर संशयित आरोपीस रात्री साडेदहा वाजेला अटक करण्यात आली. सदरील संशयित आरोपीस मा.न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली.
सदरील गुन्ह्यातील संशयित आरोपी अदनान ऊर्फे काल्या शेख युनूस राहणार आगाखान वाडा,भुसावळ. शेख साहिल शेख रशीद राहणार आगाखान वाडा,भुसावळ.अब्दुल नबी हनीप पटेल शेरा चौक,मास्टर कॉलनी जळगांव.सनिस नाईट मोहम्मद आसिफ एमआयडीसी एरिया जळगांव अशांनी दिनांक १२ जानेवारी रोजी स्वतःहा  समर्पन केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त मिळाली.तर गोळीबार प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड संशयित आरोपी वसीम पटेल व आबीद असलम पटेल या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या समक्ष हजर केले.संशयित आरोपींकडून चार पिस्टल,तीन जिवंत काडतुसे सह एक रिकामी पुंगळी असा मुद्देमाल मिळून आला.
अटक आरोपीमध्ये काही संशयास्पद ….
भुसावळ शहरातील डी डी सुपर शॉपी व कोड्रिंक्स टी हाऊस मध्ये १० जानेवारी रोजी झालेल्या गोळीबाराचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरणांची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील कैद झाली आहे मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील मारेकरी व पोलिसांनी अटक केलेल्या काही संशयित आरोपींमध्ये  संशयास्पद (तफावत) असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

0
जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत... ▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का? ▪️ जर स्मार्ट...

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

0
भुसावळ - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा...

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

error: Content is protected !!