Homeक्राईमबोदवडमध्ये पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मजूर युवकाची चाकूने भोसकून हत्या

बोदवडमध्ये पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मजूर युवकाची चाकूने भोसकून हत्या

बोदवड: बोदवड येथे आज दि. 20 रोजी पोलिस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका बांधकाम मजूर युवकाची चोरीच्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आली.

मृत युवकाची ओळख अन्सार शेखलाल पिंजारी, वय 38 वर्षे, अशी झाली आहे. आज बुधवार असल्याने बाजारातून सामान घेऊन घरी परतल्यानंतर अन्सार हा आपल्या लहान मुलगा आणि दोन मुलींना घेऊन घराजवळील किराणा दुकानात गेला होता. तेथून मुलांना खाऊ घेऊन परत घरी जात असताना अरबाज लतीफ शहा याने त्याच्या लहान मुलीला लाथ मारली आणि अन्सारवर धारदार शस्त्राने मान, छाती आणि पोटावर सपासप वार केले.

प्रकरणाची पार्श्वभूमी:
दि. 8 मे रोजी अन्सार यांच्या घरात मागील बाजूने भिंत फोडून चोरांनी प्रवेश केला होता. घरातून सुमारे 3 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 80 हजार रुपये रोख चोरीला गेले होते. याप्रकरणी 8 मे रोजीच बोदवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, चोरी गेलेल्या मालाचे पुरावे म्हणून पोलिसांनी बांगड्या, कानातील दागिने, फुलतोडे आणि 80 हजार रुपयांच्या रोकडबाबत पावत्या मागितल्या. गावातील सोनार स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित दागिने त्यांच्या दुकानात तयार झाल्याचे सांगून पावत्या दिल्या. तरीदेखील 3 लाखांची चोरी होऊनही पोलिसांनी केवळ 29 हजार रुपयांचा गुन्हा दाखल केला.

संशयित आरोपी म्हणून अरबाज लतीफ शहा आणि त्याच्या दोन साथीदारांची नावे देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली नाही, फक्त 29 हजारांचा मुद्देमाल जप्त दाखवून आरोपीला अटक न करताच प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

धमकी असूनही कारवाई नाही:
दि. 16 मे रोजी आरोपी अरबाज याने मृतकाची बहीण सलीमा पिंजारी हिला “पोलिसांना सांगितले म्हणून तुला बघून घेईन” अशी धमकी दिली होती. दि. 17 मे रोजी अन्सार आणि त्याची बहीण सलीमा यांनी पोलिस ठाण्यात जाऊन जीवे मारण्याच्या धमकीची तक्रार दिली. मात्र पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता 4 ते 5 तासांनी गुन्हा दाखल केला, पण आरोपीवर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप आहे.

दि. 19 मे रोजी आरोपीने आपल्या मोबाईल स्टेटसवर धारदार शस्त्रासह फोटो ठेवून धमकी दिली होती. याची माहिती पोलिसांना देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

हत्येनंतरही निष्काळजीपणा:
आज हत्या केल्यानंतर आरोपीने मारहाण आणि भांडणाचा बहाणा करून ग्रामीण रुग्णालयाचे मेमो घेतले आणि फरार झाला. घटनेचे कारणही न विचारल्यामुळे पोलिसांनी आरोपीला पळून जाण्याची संधी दिल्याचा आरोप आहे.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीच्या घरात तोडफोड आणि जाळपोळ केली. आरोपी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य फरार झाले आहेत.

आमदारांचा हस्तक्षेप:
घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील दुपारी सुमारे 1:30 वाजता बोदवड पोलिस ठाण्यात पोहोचले आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली. त्यावर एसपी यांनी “आम्हाला माहिती मिळाली असून कारवाई सुरू केली आहे,” असे सांगितले. मात्र पोलिसांनी आधी आरोपीला उपचारासाठी मेमो देऊन फरार होण्याची संधी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आमदारांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत बोदवडमध्ये चोरीच्या 18 घटना घडल्या आहेत. याबाबत वारंवार एसपींना माहिती देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. “पोलिस प्रशासन नागरिकांच्या संरक्षणासाठी आहे की त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्यासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मृतकाचा मृतदेह घेऊन एसपी कार्यालयात जाणार असल्याचे आमदारांनी सांगितले. तसेच सायंकाळी सुमारे 7 वाजता पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!