Homeक्राईमभुसावळ शहरात कौटूंबिक वादातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून एकाची आत्महत्या!

भुसावळ शहरात कौटूंबिक वादातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून एकाची आत्महत्या!

कौटुंबिक वादातून डिंगबर बढे यांनी स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी मारली होती. त्याच्या पायाजवळ बंदुक पडलेली होती..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील कोलते गल्ली, गंगाराम प्लॉट येथील रहिवासी यांच्या कुटुंबात गेले तीन ते चार दिवसापासून स्वयंपाक येत नाही. या कारणाने कौटूंबिक किरकोळ वाद घरात चालू होता. अचानक दि.12 मे रोजी कुटुंबातील पुरुष बढे यांनी स्वतःच्या डोक्यात गावठी बंदुकीने गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव डिंगबर बेनीराम बढे (वय-56) असे आहे.
मृत डिंगबर बढे यांचे पत्नी पदमा बढे यांच्याशी तीन ते चार दिवसांपासून किरकोळ वाद चालू होता. जावई कोमल मधुकर महाजन यांनी मध्यस्थी करून दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघे जण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दि.12 मे रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सासरे डिंगबर बढे यांनी जावई यांना फोन केला.” मला ठेवायला ये ” असे बोलून फोन कट केला. त्यानंतर 10.45 वाजेला दीपिका महाजन यांनी कोमल यास फोन करून माहेरी जावून या काही तरी घटना घडली आहे. त्यावरून कोमल सासरी कोलते गल्ली, गंगाराम प्लॉट येथे आले व घरात जावून पाहिले असता सासरे डिंगबर बढे यांनी स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी मारली होती.
त्याच्या पायाजवळ बंदुक पडलेली होती. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा त्यांचा परिवार आहे. कोमल महाजन यांनी दिलेल्या माहितीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या नोंद दाखल करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहा.पोनि. निलेश गायकवाड हे करीत आहेत. मृत बढे यांचे शवविच्छेदन भुसावळ जिल्हा शासकीय रुग्णालय, जळगांव येथे करण्यात आले आहे.

  • पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव..
शहरातील कोलते गल्ली येथे एका इसमाने स्वतःच्या डोक्यात बंदुकीने गोळी मारून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ त्याचप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण केले. व घटनेची माहिती घेतली.

  • बंदूक आली कोठून.?
भुसावळ शहरात बंदूक विक्री करणारी टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याने सहज कुणालाही बंदूक खरेदी करणे शक्य आहे? सदरील घटनेमध्ये डिंगबर बढे यांनी स्वतःच्या डोक्यात गावठी बंदुकीने गोळी मारून आत्महत्या केली मात्र घटनेमध्ये वापरण्यात आलेली बंदूक व काडतुस आले कोठून ही एक संशोधनाची बाब आहे. आजपावतो दोनशेहुन अधिक बंदूक कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या आहेत. मात्र शहरात बंदुकी येतात कुठून याचा शोध घेण्यास पोलीस प्रशासन कुचकामी ठरले आहे. झालेल्या घटनेमध्ये नेमकी बंदूक कोणाकडून खरेदी करण्यात आली होती? याचा शोध पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल भुसावळच्या सामान्य नागरिकांना भेळसावत आहे!

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!